कर्जमाफी होईलच, या आशेवर शेतकऱ्यांनी राहू नये : डॉ. राजेंद्र शिंगणे

अशा शेतकऱ्यांनासुध्दा बॅंकेने पीक कर्ज द्यावे. यांसह अनेक सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बँकेच्या कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Rajendra Shingne
Rajendra Shingne
Published on
Updated on

सरकारनामा सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सरकारची मनापासून इच्छा होती. पण मागील वर्षीपासून कोरोनाने राज्यावर आक्रमण केले Corona attacked on the state since last year आणि राज्याचे उत्पन्न घटले, तुलनेत खर्च वाढला. त्यामुळे यावर्षी तरी कर्जमाफी देणे शक्य होणार नाही. debt forgiveness will not be possible कर्जमाफी होईल या आशेवर शेतकऱ्यांनी राहू नये, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे Dr. Rajendra Shingneआज म्हणाले. 

सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी डॉ. शिंगणे आले होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली होती. ही कर्जमाफी जाहीर करत असताना काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्येसुद्धा दोन लाखापर्यंतची रक्कम जमा केली होती. ही रक्कम जमा करत असताना कोरोनाचे संकट देशासह महाराष्ट्रावर आले होते. या कोरोनाच्या संकटामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आणि अनेक उत्पन्नाचे मार्ग मागील दीड ते दोन वर्षांमध्ये बंद आहेत. 

राज्याच्या तिजोरीमध्ये ठणठणाट झाला आहे. त्यामध्येच केंद्राकडून जीएसटीची रक्कमसुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे राज्यांत आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. राज्य सरकारची इच्छा होती आणि म्हणूनच शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्ज माफी मंजूर केली होती. सरकार ती पूर्णपणे देऊ शकली नाही. राज्याच्या आर्थिक परिस्थिती रुळावर आली की, कर्जमाफी करण्यात येईल. परंतु सध्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी होईल त्यामुळे बँकेचे कर्ज भरायचे नाही थकीत ठेवायचे, या मानसिकतेमध्ये शेतकऱ्यांनी राहू नये. याही परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी कर्जमाफी होईल, या आशेवर आहेत. ते कर्ज भरत नाहीत. त्यामुळे ते कर्ज घेण्यासाठी पात्र होत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील २२ ते २४ हजार शेतकरी कर्जमुक्ती पासून वंचित आहे. 

अशा शेतकऱ्यांनासुध्दा बॅंकेने पीक कर्ज द्यावे. यांसह अनेक सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बँकेच्या कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी साहाय्यक यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बँकेचे कर्मचारी कमी असल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांवर ताण असल्यामुळे त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बँकेकडे पीक कर्जासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना पोच पावती देणे आवश्यक आहे. प्रत्येक बँकेने दर्शनी भागात कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी लावावी, अशा सूचना दिल्या आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत,  प्रवीण कथने, संतोष लोखंडे, संभाजी आप्पा पेटकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com