माजी मंत्री ठाकरेंनी सहा दशकांपूर्वीच्या आठवणी केल्या ताज्या...

१२ डिसेंबरला त्या बैलडमनी मध्ये स्वतः नातवंडांसोबत बसून आयोजित कार्यक्रमस्थळी आले आणि सर्वांना अवाक केले.
Subhash Thakre Bail Damni
Subhash Thakre Bail Damni
Published on
Updated on

मंगरुळपिर (जि. वाशीम) : आजच्या युगात नवनवीन अत्याधुनिक वाहने आली आहेत. पण पाच ते सहा दशकांपूर्वीचा काळ वेगळा होता. तेव्हा लोक बैलडमनीतून प्रवास करायचे. आजही ग्रामीण जीवनाशी नाळ जुळून असलेले माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी चक्क बैल डमनीतून प्रवास करून जुन्या आठवणी ताज्या केला. त्यांच्या या प्रवासाने गावकरीही अवाक झाले. 

कधी काळी ग्रामीण भागात एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी शेतकरी बैल डमनीतून प्रवास करायचे लग्नानंतर नवरीला माहेरी नेण्यासाठी व माहेरून आणण्यासाठी बैल डमनीतून प्रवास केला जात होता. यात्रा, महोत्सव, देवदर्शन किंवा उपचारासाठी कुणाला ग्रामीण भागात ये-जा करण्यासाठी बैल डमनीचा प्रवास असे. परंतु काळ बदलत गेला अनेक नवनवीन वाहने हळूहळू येत गेली. डमनीचे रूपांतर बैलबंडीत झाले नंतर नंतरच्या काळात एसटी आली ग्रामीण लोकांनी प्रवासासाठी एसटीला पसंती दिली, मोटारसायकल आली आणि आता अनेक वाहने आल्याने शेतकऱ्यांची बैलडमनी नामशेष झाली. 

माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांनी वडिलोपार्जित असलेली बैल डमनी आपल्या कासोळा येथील घरी जपून ठेवली. तिला पूर्वी सारखेच सजवून १२ डिसेंबरला त्या बैलडमनी मध्ये स्वतः नातवंडांसोबत बसून आयोजित कार्यक्रमस्थळी आले आणि सर्वांना अवाक केले. शेतकरी भूमिपुत्र म्हणून जिल्ह्यात ओळख असलेले सुभाषराव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसह नवीन पिढीला बैल डमनीची आठवण करून दिली आणि कधीकाळी ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनशैली कशी असायची, याची आठवण करवून दिली.

त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले की माझ्या लग्नाच्या वेळी याच बैलडमनीमधून मी प्रवास केला होता. त्याकाळी मी स्वतः बैलडमनी हाकायचो. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्या ग्रामीण जीवनशैलीबाबत असलेला जिव्हाळा आजही किती मजबूत आहे, याची कार्यक्रमस्थळी चर्चा सुरू होती.
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com