The formula of 'Mahavikas' will be implemented in Satara District Bank to stop BJP
The formula of 'Mahavikas' will be implemented in Satara District Bank to stop BJP

भाजपला रोखण्यासाठी सातारा जिल्हा बँकेत राबणार 'महाविकास'चा फॉर्म्यूला  

पालकमंत्र्यांनी महाविकासचा फॉर्म्यूला राबवत बँकेत सर्वांची मोट बांधली तर भाजपला ही निवडणूक सोपी राहणार नाही. पण सर्व गणिते जुळविताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घेणे ही राष्ट्रवादीला फायद्याचे ठरणार आहे.
Published on

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीला तीन महिने मुदतवाढ मिळाली असली तरी महाबळेश्वर तालुक्यातून उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर शासनानेच ही निवडणूक फेब्रुवारीमध्ये घेण्याची तयारी केली आहे. येत्या एक दोन दिवसांत याबाबतचे आदेश निघणार आहेत. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलविरोधात भाजपने पॅनेल टाकण्याची भूमिका ठेवली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत भाजपला रोखण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या निवडणूकीत महाविकासचा फॉर्म्यूला राबविला जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहकार विभागाने कोरोनाचे कारण करून मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांना स्थगिती देत संचालकांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे आता सर्व निवडणूका मार्चनंतरच होणार आहेत. पण सातारा जिल्हा बँकेसंदर्भात महाबळेश्वरमधून एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी होत असतानाच शासनाने निवडणूका घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे ही याचिका मागे घेतली जाणार आहे.

परिणामी फेब्रुवारीमध्ये जिल्हा बँक व कृष्णा कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबतची सूचना येत्या दोन दिवसांत होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकिय हालचाली गतीमान होणार आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेत साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याविचाराचे पाच संचालक बँकेत आहेत. तर खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे हे दोन संचालकही भाजपमध्ये आहेत.

या दिग्गज संचालकांच्या मदतीने भाजपने सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पण शिवेंद्रसिंहराजेंची बँकेतील ताकद लक्षात घेता त्यांना आपल्यासोबत घेऊन ही निवडणूक स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून लढण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.  गेल्यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांना तज्ञ संचालक म्हणून बँकेवर घ्यावे लागले. आता यावेळेस ते सहकारमंत्री व पालकमंत्री असल्याने त्यांच्याच नेतृत्वाखाली बँकेची निवडणूक होणार आहे.

राज्यात सध्या सर्व निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या
जात आहेत. तोच फॉर्म्यूला आता सातारा जिल्हा बँकेतही राबविला जाणार का हेही तितकेच महत्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी जिल्हा बँकेची निवडणूक महत्वपूर्ण आहे. तसेच शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई हे गृहराज्यमंत्री असल्याने त्यांनाही यावेळी जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीकडून ॲडजेस्ट केले जाण्याची शक्यता आहे. पालकमंत्र्यांनी महाविकासचा फॉर्म्यूला राबवत बँकेत सर्वांची मोट बांधली तर भाजपला ही निवडणूक सोपी राहणार नाही. पण सर्व गणिते जुळविताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घेणे ही राष्ट्रवादीला फायद्याचे ठरणार आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com