सातारा : मैत्री म्हणजे दोन अनोळखी मनातुन निर्माण झालेले भाव...मित्र व्हायला वेळ लागत नाही पण सच्चा मित्र मिळायला नशीबच लागतं, असं म्हणतात. इथे ना जात-धर्म, गरीब-श्रीमंत हा कोणताच भेद नसतो. त्याला राजकारण तरी कसा अपवाद असेल. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार मकरंद पाटील यांची दोस्तीही अशीच राजकारणालिकडली. दोघेही विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांचे आमदार पण कॉलेजपासूनचे त्यांचे ऋणानुबंध आज इतक्या वर्षांनंतरही तितकेट घट्ट आहेत. (Friendship Day Shambhuraj desai and Makarand Patil are close friend)
मकरंद पाटील व शंभूराज देसाई हे दोघेही सातारा जिल्ह्यातील. पाटील वाईचे आमदार तर देसाई हे पाटणचे. या दोघांची मैत्री असेल असे कोणालाही वाटणार नाही. पण अगदी कॉलेज जीवनापासून दोघांच्या मैत्रीला सुरवात झाली. आज दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यातील निखळ मैत्रीत कुठेही खंड पडलेला नाही. आजही दोघेजण एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात.
दोन राजकारणातील व्यक्तींची मैत्री तशी दुर्मिळच असते. सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांची मैत्री पहायला मिळणे अशक्यच. पण या अशक्यतेला छेद देणारी मैत्री आहे, पाटील व देसाई यांची. या दोघांच्या मैत्रीविषयी फारशी कोणालाच माहिती नाही, असलीच तर ती त्यांच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्यांनाच. दोघांच्याही पक्षाची विचारधारा भिन्न असली तरी त्यांच्या मैत्रीतील भाव, एकमेकांबद्दलचा वाटणारा जिव्हाळा सारखाच आहे.
आज मैत्री दिनानिमित्त या दोन आमदारांतील मैत्री विषयी जाणून घेतले. आमदार मकरंद पाटील म्हणाले, की कॉलेज जीवनापासून आमची मैत्री सुरू झाली. आम्ही जरी वेगवेगळ्या कॉलेजात शिकलो असलो तरी आमची मैत्री कायम होती. आज आम्ही दोघेही आमदार आहोत. तेही वेगवेगळ्या पक्षांचे. आमच्या पक्षीय भुमिका वेगळ्या असल्यातरी पक्षीय राजकारण आमच्या मैत्रीच्या आड कधीच आले नाही.
कॉलेज जीवनापासून सुरू झालेली आमच्यातील निखळ मैत्री आजही कायम आहे. आजही आम्ही एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. आमच्या मैत्रीच्या आड कधीही राजकारण येत नाही, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. राजकारणाला छेद देत या दोघांनी जपलेली ही मैत्री इतर नेते व कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.