पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, गस्त घालणाऱ्या पोलिसांनी संयम ठेवावा...

मागील काही दिवसांत शहरात मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडल्या. एक गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या पूर्वी देखील मुलगी घरातून निघून गेली होती. काही दिवस बाल सुधारगृहात होती.
Nitin Raut
Nitin Raut
Published on
Updated on

नागपूर : पोलिसांनी मारहाण करून अपमानित केल्यामुळे महेश राऊत याने आत्महत्या केली. त्यानंतर शहरातील वातावरण काहीसे तापले होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी विशेषतः गस्त घालणाऱ्या बीट मार्शल्सनी काम करता संयम बाळगावा, असे राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत आज येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. 

गस्त घालणारे पोलिस म्हणजेच बीट मार्शलचे परिसरातील लोकांसोबत चांगले संबंध नसल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी नम्र असावे. लोकांशी चांगले संबंध ठेवावे. लोकांमध्ये पोलिसांप्रति विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिस आयुक्तांना या बीट मार्शलचे वर्ग घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. शहरातील सहपोलिस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची पदे येत्या १५ दिवसांत भरण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी प्रामुख्याने उपस्थित होते.

गुन्हेगारीमुक्त शहराची संकल्पना साकारण्यासाठी नागपूरकरांची भूमिका महत्वाची आहे. पोलिसांना योग्य सहकार्य केल्यास हे शक्य आहे. पोलिस आणि नागरिकांमध्ये योग्य तो ताळमेळ असावा. त्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याची गरज आहे. कोरोनाची तिसरी लाट नागपुरात येण्याची शक्यता असल्याने लोकांनी त्यापासून सावध रहावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रपरिषदेत केले. 

पुढील तीन महिने शहरासाठी महत्वाचे आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नाशिकपासून सुरुवात झाली आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. नाशिकची लाट नागपुरात यायला वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी शहर पोलिसांनी चांगल्या प्रकारे काम केले. कोरोनाची लाट असतानासुद्धा पोलिसांनी जिवाची पर्वा केली नाही. वेळप्रसंगी धाक दाखवून लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखले आणि शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. काही लोक मास्क लावत नाही. पोलिसांनी त्यांना पकडल्यास उद्धटपणे उत्तरे देतात. त्यातून वादाच्या घटना घडत असतात. आपल्या प्रयत्नांमुळेच शहरातील मृत्यूदर शून्यावर आणायला मदत झाली. परंतु, कोरोनाची संख्या कमी आणि मृत्यूदर शून्य असला तरी लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले. 

निष्पक्ष चौकशीचे निर्देश 
मागील काही दिवसांत शहरात मन हेलावून टाकणाऱ्या घटना घडल्या. एक गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या पूर्वी देखील मुलगी घरातून निघून गेली होती. काही दिवस बाल सुधारगृहात होती. गतिमंद व्यक्तीची मानसिक अवस्था वेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे ती प्रतिकार करू शकली नाही. या घटनेतील दोषी आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी सखोल तपास करून न्यायालयात बाजू मांडण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. महेश राऊत प्रकरणात पोलिसांना सर्व माहिती घेण्यास सांगून वस्तुस्थिती चांगल्या प्रकारे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. 
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com