वाजपेयींना पाहूनच मोठे झालो, महाराष्ट्रातील त्यांची एकही सभा चुकवली नाही...

खासदार म्हणून मला दहा वर्ष लोकसभेत त्यांच्या सहवास लाभला. १९९९ आणि २००४ या दोन लोकसभा निवडणुकीत अटलजी माझ्या प्रचारासाठी भोकरदनला आले होते. जालन्यात त्यांनी एक दिवस मुक्काम देखील केला होता. तेव्हा आम्ही पक्ष निधी म्हणून त्यांना एक लाखांची थैली त्याकाळात दिली होती. कार्यकर्त्यांवर प्रचंड पकड असणारे त्यांचे नेतृत्व होते.
Minister Raosaheb danve memory news aurangabad
Minister Raosaheb danve memory news aurangabad

भोकरदन ः अटलबिहारी वाजपेयी यांनी १९८० मध्ये पराभव झाला, देशात जेव्हा भाजपचे दोनच खासदार होते, तेव्हा देखील कधी विचारांशी असलेली बांधिलकी सोडली नाही. अन् २३ पक्षांचे सरकार चालवतांना देखील विचारांशी तडजोड केली नाही. राजकारणा नसतांना म्हणजे अगदी लहानपणापासून वाजपेयी यांना पाहण्याचा मला योग आला. त्यांना पाहतच मोठा झालो, महाराष्ट्रातील एकही सभा मी कधी सोडली नाही. सोलापूरच्या सभेला कुठलेही साधन नसतांना मी गेलो होतो, अशी आठवण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली.

जनता पार्टीत फूट पडू नये यासाठी अटलजींनी खूप प्रयत्न त्याकाळात केले. भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर जेव्हा पराभव झाला तेव्हा तो खुल्या दिलाने मान्य करून त्यांनी पुन्हा जतेत जाऊ, लोकांचा विश्वास जिंकू असे सिल्लाेडच्या सभेमध्ये सांगितले होते. मुंबईत भाजपच्या स्थापनेनंतर ब्रांद्याच्या मैदानावर पहिले अधिवेशन झाले, त्यात अटलजींची पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी `अंधेरा झटेगा, सुरज निकलेंगा, कमल खिलेंगा`, असा विश्वास व्यक्त केला होता.

खासदार म्हणून मला दहा वर्ष लोकसभेत त्यांच्या सहवास लाभला. १९९९ आणि २००४ या दोन लोकसभा निवडणुकीत अटलजी माझ्या प्रचारासाठी भोकरदनला आले होते. जालन्यात त्यांनी एक दिवस मुक्काम देखील केला होता. तेव्हा आम्ही पक्ष निधी म्हणून त्यांना एक लाखांची थैली त्याकाळात दिली होती. कार्यकर्त्यांवर प्रचंड पकड असणारे त्यांचे नेतृत्व होते. दोन खासदारांचा पक्ष ते आज देशातील सर्वात मोठा आणि बहुमातने देशात सत्तेवर असलेला पक्ष करण्यात अटलजी आणि अडवाणी यांचा मोठा वाटा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून अटलजींनीच त्यांना राष्ट्रीय महामंत्री केले होते. पुढे ते गुजरातचे मुख्यमंत्रीही झाल्याचे दानवे यांनी सांगितले. अटलजी खूप महान नेते होते, त्यामुळे त्यांचा सहवास किंवा सभेच्या माध्यमातून होणारे मार्गदर्शन हेच आमच्यासाठी प्रेरणादायक ठरले. राजकारणात आल्यानंतर दहा वर्ष त्यांच्या सहवास लाभला असला तरी लहानपणापासून मी त्यांना पाहत आलो. महाराष्ट्रात कुठेही त्यांची सभा असली की मी तिथे जायचो, अशी एकही सभा नाही जी मी ऐकली नाही किंवा पाहिली नाही.

मला आठवतं सोलापूरला अटलजींची सभा होती. भोकरदनहून थेट सोलापूरला जाण्याची सोय नव्हती. पण त्यांची सभा चुकावयची नसल्यामुळे मिळेत त्या वाहनाने मी सोलापूर गाठले, अटलजींची सभा ऐकली.  पण परत येण्यासाठी काही साधन नव्हते. ज्या जागेवर सभेसाठी मंडप टाकला होता, त्या मंडपवाल्या सोबत रात्र तिथेच काढली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मिळेल त्या वाहनाने सोलापूरहून भोकरदनला आलो.

शब्दांकन ः तुषार पाटील 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com