फुलंब्री: फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच मी प्रयत्नशील असून पाच वर्षात 1470 कोटी रुपयांची वेगवेगळी विकासकामे केली. भाजप सरकारने लागू केलेल्या मराठा आरक्षणाला माझ्याच सहीने मंजुरी मिळाली ही खरी उपलब्धी असल्याचे मत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
मतदारसंघात केलेली विकासकामे हा मुद्दा घेऊन बागडे मतदारांना सामोरे जात आहेत. बागडे म्हणाले, फुलंब्री विधानसभा मतदारसंघात युतीच्या काळातच मोठ्या प्रमाणत विकासकामे झालेली आहेत. कॉंग्रेस सरकारच्या काळात मतदार संघाची बिकट अवस्था होती. शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नव्हता, महामार्गाबरोबरच गावागावला जोडणाऱ्या छोट्या मोठ्या रस्त्याची अत्यंत वाईट स्थिती होती. शेतकऱ्यांना मुबलक वीज मिळत नव्हती..? दळणवळणाची सुविधा नव्हती. त्यामुळे जनतेनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली. मी निवडून आल्यानंतर प्रथम शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन गावागावातील रस्त्याचे मजबुतीकरण केले. प्रत्येक गावात व वाड्या वस्त्यावर घरामध्ये 24 तास वीज राहावी यासाठी सिंगल फेस रोहित्र मोठ्या प्रमाणत बसविले.
जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या रस्त्यांना जिल्हामार्ग म्हणून नावारूपास आणले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी देऊन रस्त्याचे दर्जेदार कामे करून घेतली. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा विकास होत आहे.
पिक विमा, दुष्काळी अनुदान, लष्करी अळीचे अनुदान, कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. सर्व विभागाच्या मंत्र्याकडून मतदार संघासाठी विकास निधी आणला. मी विधानसभा अध्यक्ष असल्याने सर्वच मंत्र्यांनी माझ्या शब्दाचा मान राखला. त्यामुळे सुमारे 1470 कोटी रुपयांची विविध विकासकामे मतदार संघात करू शकलो. या विकासाच्या जोरावरच पुन्हा जनता मलाच निवडून देईल असा विश्वास हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणावर सही
मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी माझी पहिल्यापासूनच भूमिका होता. अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या मराठा समाजाचे लाखोच्या संखेतील विराट मोर्चाची दखल भाजप सरकारने घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून विधानसभेत ठराव मांडल्यानंतर मी लगेच स्वाक्षरी करून मराठा आरक्षनाला मंजुरी दिली. त्यामुळे मराठा आरक्षणही माझ्याच स्वाक्षरीने लागू झाले याचा आनंद आहे असेही बागडे सांगतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.