बोरी गावच्या स्नेहलची झेप IAS  झाल्यानंतर या जिल्ह्यात नियुक्ती

अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत देशात १०८ वी रँक मिळवत आयएएस झाल्या. महाराष्ट्रात सर्वात तरुण महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला.
Snehal Dhaigude
Snehal Dhaigude
Published on
Updated on

लोणंद (ता. खंडाळा) : बोरी गावची सुकन्या व  खंडाळा तालुक्यातील पहिली महिला आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळविलेल्या स्नेहल नानासाहेब धायगुडे या नुकत्याच राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारीपदी रूजू झाल्या आहेत.

  कायम दुष्काळी पट्टयातील येणाऱ्या खंडाळा तालुक्यातील बोरी सारख्या  लहानशा खेडयात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि लोणंद, साखरवाडी व माळेगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुणे येथील कृषी महाविद्यालयातून बी.एसस्सी ॲग्री ही पदवी मिळवली. त्यानंतर स्नेहल धायगुडे यांनी स्पर्धा परिक्षांकडे विशेष लक्ष केंद्रित केले.

अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत देशात १०८ वी रँक मिळवत आयएएस झाल्या. महाराष्ट्रात सर्वात तरुण महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला.


 वडिल नानासाहेब धायगुडे हे पोलिस दलात कार्यरत आहेत. आई वर्षा गृहिणी असून शेतीही सांभाळतात. घरातील अन्य लहान थोर सर्वजण बोरी येथे एकत्र राहतात. स्नेहलने हे यश मिळवताना खंडाळ्याच्या ज्ञानज्योती सावीत्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा वसा पुढे नेताना खंडाळा तालुक्याची मान उंचवणारी कामगिरी केली आहे. 

तालुक्यातील अन्य मुलामुलींपुढे आदर्श निर्माण करताना ग्रामीण विदयार्थ्यांच्यातही उत्तम टॅलेंट असते. पोलिस व शेतकऱ्यांची मुलेही कुठे कमी नसतात हे सिद्ध केले आहे. एक वर्षाच्या केंद्रीय प्रशासकीय प्रशिक्षणानंतर त्यांची राजस्थानमधील उदयपूर जिल्हयाच्या परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी त्यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. याबद्दल स्नेहल धायगुडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com