सातारा : उदयनराजेंना तिसऱ्यांदा खासदार व्हायचे असेल आणि त्यांना जिल्ह्याचा खरोखरच विकास करायचा असेल तर त्यांनी भाजपमध्ये येऊन निवडणुक लढावी. तरच ते खासदार होऊन नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवतील. याबाबत खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा भाजपचे खंडाळ्यातील नेते पुरूषोत्तम जाधव यांनी केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात पुरूषोत्तम जाधव यांनी म्हटले की, सर्वच पक्षांना साताऱ्याचे खासदार उदयनराजेंविषयी प्रेम आहे. परंतू त्यांची संसदेतील उपस्थिती नगण्य आहे. गेल्या दहा वर्षात सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खासदार पोहोचू शकलेले नाहीत, अशी सर्वसामान्य जनतेची खंत आहे. औद्योगिक विकास खुंटला आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी राजकारणात जातीय समीकरणासाठी सातारा जिल्ह्याचा बळी देऊ नये, अशी सातारकरांची भावना आहे. या भावनेचा सर्व पक्षिय नेत्यांनी विचार करावा. अन्यथा सर्व पक्षिय सातारकर जनता ही निवडणुक ताब्यात घेतील असे ते म्हणाले.
2014 मध्ये देशात नरेंद्र मोदींची लाट होती. तसेच सातारच्या विद्यमान खासदारांविरोधात प्रचंड असंतोषाचे वातावरण होते. त्यावेळी साताऱ्यातून शिवसेनेचा खासदार शंभर टक्के निवडुन येईल, असे वातावरण होते. पण साताऱ्याची जागा शिवसेनेने का सोडली याचा खुलासा काल मंत्री रावतेंच्या माध्यमातून समस्त सातारकरांना झाला. त्यावेळी मी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणुक लढलो. तेव्हा मला एक लाख 55 हजार मते मिळाली होती. गेल्या दहा वर्षात सातारच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे उदयनराजेंना जर तिसऱ्यांदा खासदार व्हायचे असेल आणि जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर त्यांनी भाजपमध्ये येऊन निवडणुक लढवावी तरच ते तिसऱ्यांदा खासदार होऊ शकतील. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळवू शकतील, अशी अपेक्षा श्री. जाधव यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.