गेवराईतून भाजपला 20 ते 25 हजारांची लीड; प्रीतम मुंडेंचा विजय निश्‍चित : लक्ष्मण पवार

गेवराईतून भाजपला 20 ते 25 हजारांची लीड; प्रीतम मुंडेंचा विजय निश्‍चित : लक्ष्मण पवार

स्वातंत्र्यानंतर कधी नव्हे एवढी विकासाची कामे गेवराई मतदार संघात झाली. रस्त्यांचे मुख्य प्रश्न सोडविण्यात यश आले. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यामुळेच ही कामे झाली. त्यामुळे लोकांनी विकासाला मत दिले आहे. गेवराई मतदार संघातून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना ते हजारांची लिड मिळेल आणि त्याच विजयी होतील, असा अंदाज आणि दावा भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केला.

गेवराई (जि. बीड) : गेवराई मतदार संघात स्वातंत्र्यापासून सत्ता भोगणाऱ्या नेत्यांनी कधीच सामान्यांच्या जिव्हाळाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नव्हते. या भागात रस्त्यांचा प्रश्न गंभीर होता. रस्त्यांची कामे तर मार्गी लागलीच शिवाय दर्जेदार कामे झाली. पालकमंत्री पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांच्या माध्यमातून केलेला विकास जनतेसमोर मांडला आणि त्यामुळेच आम्हाला या मतदार संघातून हमखास 20 ते 25 हजार मतांचे अधिक्‍य मिळेल, लोकसभेला डॉ. प्रीतम मुंडे विजयी होतील, असा अंदाज आणि दावा भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केला. 

भाजपने लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविली तर राष्ट्रवादीने केवळ जातीयतेच्या मुद्द्यावर असा आरोपही लक्ष्मण पवार यांनी यावेळी केला. माझ्या साडेचार वर्षांच्या काळात मी मतदार संघात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे केली. विशेष म्हणजे सर्व कामे दर्जेदार आहेत. केंद्र, राज्य सरकारकडून निधी मिळविताना पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांचीही मदत झाली. 

याचबरोबर पाणी योजना, विविध कार्यालयांच्या इमारती, गावांतर्गत रस्ते - नाल्या अशी विविध विकास कामे झाली आहेत. गेवराई मतदार संघात स्वस्त धान्याचा वर्षानुवर्षे मोठा काळाबाजार होता. त्याला आळा बसविण्यात यश आले. केंद्र सरकारची नुकतीच सुरु झालेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, कर्जमाफी, दुष्काळ अनुदान, पिक विमा यांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. आपण, विविध कार्यालयांत असलेल्या दलाली प्रवृत्तीला आळा घातल्याचा दावाही लक्ष्मण पवार यांनी केला. याच कामांच्या जोरावर आम्ही मते मागीतली. त्याला सर्व घटकांतून प्रतिसाद मिळाला. आमच्या मतदार संघात जातीयवादाला थारा भेटला नाही असे मतही लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केले. विकासाच्या जोरावर मत देण्याचा आवाहनाला सामान्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे गेवराई मतदार संघातून भाजपच्या डॉ. प्रितम मुंडे यांना ते हजारांचे मतदाधिक्‍क्‍य असेल. त्यांचा विजय हमखास होईल, अशी खात्रीही लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com