मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा रविवारी (ता. 31ऑक्टोबर) घेण्यात येणार आहे. यासाठी परीक्षार्थी तसेच, परीक्षा प्रक्रिया कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 30 व 31 ऑक्टोबरला लोकल रेल्वेने (Local Railway) प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असे पत्र राज्य शासनातर्फे (State Government) रेल्वे विभागाला (Indian Railway) देण्यात आले आहे.
राज्य शासनाकडून मध्य रेल्वे तसेच, पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, एमपीएसी परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचारी या परीक्षेसाठी प्रवास करणार आहेत. त्यांना 30 व 31 ऑक्टोबर रोजी परीक्षेची तयारी तसेच, परीक्षा घेण्यासाठी लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी. त्याचप्रमाणे 'एम एस इनोव्हेटिव्हवी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' हे सुद्धा एमपीएससी परीक्षेच्या कामाशी निगडीत असल्याने त्यांनाही वैध तिकिटावर एका दिवसाकरीता प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी याबरोबरच, गरज भासल्यास परीक्षा प्रवेशपत्र (हॉल तिकीट), कर्मचाऱ्यांचे ओळख पत्र (आयडी कार्ड) तसेच, परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला देण्यात आलेले प्रतिनियुक्ती पत्र याची शहनिशा करून परवानगी द्यावी असे, पत्रात सविस्तरपणे लिहीले आहे.
हेही वाचा : नागपुरात एसटी चालकाने झाडावर चढून केला आत्महत्येचा प्रयत्न...
ऑक्टोबर रोजी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना थोडासा का होईना, पण दिलासा मिळाला, असे वाटत असताना आज नागपुरात एसटी चालक झाडावर चढला आणि तेथून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इतर कर्मचाऱ्यांनी वेळेवर धाव घेऊन त्याला वाचवले आणि अनर्थ टळला.
एसटीतील कमलेश ठाकरे हा चालक महामंडळाच्या धोरणांमुळे वैतागला होता, असे सांगण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एसटी डेपोमध्ये चालक दिलीप हरिभाऊ काकडे (वय ५६, रा. आव्हाने, ता. शेवगाव) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ताजी असताना नागपुरातही तशीच घटना घडणार होती. त्यामुळे सरकारने आता तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या गंभीरपणे घेऊन त्या पूर्ण कराव्या, अशी मागणी जोर धरत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू होते. यामुळे प्रवाशांची चांगलीच अडचण निर्माण होती. काही मागण्या मान्य केल्याने एसटीचा संप मागे घेण्यात आला. असे असले तरी नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. कमलेश यांनी झाडावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात आली. त्यांनी झाडाकडे धाव घेत कर्मचारी ठाकरेला खाली उतरवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मागण्या मान्य झाल्या असल्या तरी एसटी कर्मचारी आर्थिक संकटात असल्याने ठाकरे यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबरचे देय नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकी एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यात यावी, अशा मागणी एसटी महामंडळातील सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी भत्ते अदा करण्यात यावे या मागणीसाठी २७ ऑक्टोबरला उपोषण करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.