मोठी बातमी! राज्यातील 14 जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध शिथिल; इतर जिल्ह्यांना दिल्या महत्वपूर्ण सुचना

ज्या जिल्ह्यात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव कमी झाला अशा मुंबईसह राज्यातील 14 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे.
Covid
Covid Sarkarnama: Maharashtra corona updates
Published on
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात कोरोना (Covid-19) रूग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे राज्य सरकारने करोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत आता नवी नियमावली जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. या नियमावलीची अंमलबजावणी ४ मार्चपासून होणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून (Mahavikas Aghadi Government) सांगण्यात आले आहे. (Maharashtra corona updates)

या नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील इतर जिल्ह्यांतील मनोरंजन स्थळे, पर्यटन व धार्मिक स्थळे हे ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.

Covid
युद्धाचा परिणाम; युक्रेनमधून भारतात परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, अशा मुंबईसह राज्यातील 14 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांची आता कोरोना निर्बंधनातून सुटका करण्यात आली आहे. शासनाच्या नव्या नियमावलीनुसार या 14 जिल्ह्यात सिनेमा, नाट्यगृहे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, स्पा सेंटर, स्पोर्टस, सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये व सर्व उद्योग व्यवसाय हे 100 टक्के सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Covid
रशिया-युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थ्याचा दुसरा बळी

या 14 जिल्ह्यांतील 90 टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीची पहिला मात्रा मिळाली असून 70 टक्के लोकांना दुसरी मात्रा मिळाली आहे. याबरोबरच या जिल्ह्यांतील पॉझिटीव्हिटी रेट हा दहा टक्क्यावर आला असून ऑक्सिजन सपोर्टेड बेड व आयसीयू बेडची क्षमता 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या 14 जिल्ह्यांना 'ए' श्रेणीत टाकले आहे. 'ए' श्रेणीतील जिल्ह्यांना त्यामुळेच निर्बंधात सूट देण्यात आल्याचे सांगण्यात आले असल्याचे नियमावलीत म्हटले आहे. तर, इतर जिल्ह्यात हॉटेल, सिनेमा आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. या जिल्ह्यातील काही कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com