महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला लागलेला शाप : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर 

ओबीसींविरुध्द याचिका दाखल करणारांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य व एका जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आरक्षण नेमकं कुणाला हाणुन पाडायचं आहे, असा सवाल खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे.
Mahavikas Aghadi government curses Maharashtra: MP Ranjitsinh Naik Nimbalkar
Mahavikas Aghadi government curses Maharashtra: MP Ranjitsinh Naik Nimbalkar
Published on
Updated on

फलटण शहर : राज्यात ओबीसी समाजाबाबत सुडाचं राजकारण होत आहे. ओबीसी व मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीचे शासन चुकीच्या पध्दतीने दिशाभुल करित आहे. तीन तिघाडी आणि काम बिघाडी असं हे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राला लागलेला शाप आहे, अशी घणाघाती टीका खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. Mahavikas Aghadi government curses Maharashtra: MP Ranjitsinh Naik Nimbalkar

स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींचे धोक्यात आलेले राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे व ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यांसाठी आज भाजपाच्यावतीने फलटण येथे क्रांतीसिंह नाना पाटील चौकात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

ओबीसींविरुध्द याचिका दाखल करणारांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य व एका जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आरक्षण नेमकं कुणाला हाणुन पाडायचं आहे, असा सवाल उपस्थित करुन खासदार रणजितसिंह म्हणाले, आजच आंदोलन प्रातिनिधीक स्वरुपाचं आहे. जर प्रायोगिक आकडेवारी (इंपेरिकल डेटा) देवून आरक्षण पुन्हा लागू केले नाही व सरकारने या मुद्द्यावर जर लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करुन भाजपाला महाराष्ट्र बंद ठेवावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

आंदोलनामध्ये जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, सुशांत निंबाळकर, अभिजीत नाईक निंबाळकर, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, सुनिल जाधव, पिंटू इवरे, बाळासो ननावरे, संदीप नेवसे, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव मुक्ती शहा, तालुकाध्यक्षा उषा राऊत आदींसह भाजपाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, कार्यकर्ते उपस्थित होते. सदर आंदोलनानंतर पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांना निवेदन देण्यात आले. 

......म्हणून त्या सर्वांचा निषेध

सत्तेवर येवून वेगवेगळ्या प्रकारे दुष्काळी भागास होरपळ ठेवल्याने महाविकास आघाडी शासनाचा निषेध. सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला मात्र प्रत्यक्षात लोकांचा जिवनपट कोरा व्हायची वेळ आलीय, त्यामुळे शब्द न पाळणारे खोटारडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निषेध, त्यांना साथ देणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही निषेध. आमच्या हक्काचं नीरा-देवघरचं पाणी बारामतीला पळवून नेणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही निषेध तर ओबीसी समाजाविरोधात याचिका दाखल केल्याने राष्ट्रीय काँग्रेसचाही निषेध यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com