मराठा आरक्षणप्रश्नी मंत्रालयात घुसू : नानासाहेब जावळे

राज्य शासनाने योग्य भूमिका मांडून मराठा समाजाला न्याय द्यावा, मराठा आरक्षणाविषयी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रालयात घुसून चाबकाने फटके देण्यात येतील, अशा इशाराछावा संघटनेचे संस्थापकअध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला.
nanasaheb jawale.jpg
nanasaheb jawale.jpg

लातूर : राज्य शासनाने योग्य भूमिका मांडून मराठा समाजाला न्याय द्यावा, मराठा आरक्षणाविषयी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रालयात घुसून चाबकाने फटके देण्यात येतील, अशा इशारा छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी दिला.

लातूर येथील एका बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यभर मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असून, लातूर इथं मराठा क्रांती मोर्चा आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी जावळे यांनी 25 वर्षांपूर्वी केली होती. ओबीसी संवर्गाची टक्केवारी वाढवावी व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे, असा ठराव एकमताने करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात 8 ते 18 मार्चपर्यंत सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आरक्षणासाठी शांततेत आंदोलन सुरू राहणार असून, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही व स्थगिती उठली नाही, तर राज्याचे मंत्री, आमदार, खासदार यांना चाबकाचे फटके देणार असल्याचा इशारा जावळे यांनी दिला.
 

हेही वाचा..

धुराने गुदमरतोय कुकाणेकरांचा श्वास ! 

कुकाणे : कचरा उचलण्यासाठी घंटागाडी घरोघरी जाते, तरीही नेवासे-शेवगाव मुख्य रस्त्यासह सर्वच अंतर्गत रस्ते व चौकांत कचरा सर्रास पेटविला जातो. वायुप्रदूषण वाढले असून, श्वसनविकारांत वाढ होत आहे. कचरा जाळल्याने होणारे प्रदूषण, धूर व वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या कचऱ्याच्या राखेने कुकाणेकरांचा श्वास गुदमरला आहे. 

कुकाण्याची मुख्य बाजारपेठ नेवासे-शेवगाव रस्त्यावर वसली आहे. प्लॅस्टिक पिशव्या, कागद, पुठ्ठे, भंगारात आलेल्या तारा यांसह दिवसभरातील कचरा रस्त्यालगतचे काही व्यावसायिक रोज सायंकाळी किंवा रात्री दुकानासमोर रस्त्यावरच जाळतात. त्यामुळे रात्री कुकाण्यासह परिसर धुराने व्यापतो. यातून अनेकांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो. लहान मुले, वृद्ध, तसेच गर्भवतींचे आरोग्य यामुळे धोक्‍यात आले आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दाखल घेण्याची गरज आहे. जाळून कचऱ्याची ज्या दुकानांसमोर विल्हेवाट लावली जाते, किंवा ज्या ठिकाणी राख दिसत असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्‍यक आहे.

या आजारांना निमंत्रण! 

जळालेल्या कचऱ्यातून विषारी वायू व धूर वातावरणात पसरतो. त्यामुळे कर्करोग, यकृताचे आजार, मेंदूविकार, अस्थमा होण्याची दाट शक्‍यता असते. फोम जाळल्याने निर्माण होणाऱ्या स्टायरीन वायूमुळे फुफ्फुसांसह त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे असा त्रास होतो. विशेषत: गर्भवती महिला, वृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत असल्याचे कुकाण्यातील डॉ. कुलदीप पवार यांनी सांगितले. 

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com