अमरावती : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती कोविडची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर प्राधान्यक्रमाने केली जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत Higher and techmical education minister Uday Samant आज येथे म्हणाले. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्ह्याकरिता भेट देण्यात आलेल्या व्हेंटीलेटरच्या हस्तांतरण कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याची ही माहिती दिली. He gave this imformation in the press conference
मंत्री सामंत काल वर्धा येथे होते. तेथेही त्यांनी बैठक घेऊन उच्च व तंत्र शिक्षण विभागासंबंधी घेण्यात आलेल्या नव्या निर्णयांची माहिती दिली. कोविडच्या परिस्थितीमुळे सरकारला काम करण्यात विविध अडचणी येत आहेत. कोविडमुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट नसतानाही सर्व काही सुरळीत करण्याचे सरकारचे प्रयत्न आहे. सद्यःस्थितीत कोविडचा प्रकोप बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास अधिक वेगाने काम करणे शक्य होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे तूर्तास राज्यातील पदभरती शक्य नाही. मात्र ही महामारी आटोक्यात येताच सर्वच उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापकांच्या जागा भरण्यात येतील. तशी परवानगी वित्त विभागाकडून मिळताच या जागा भरण्यात येतील, अशी माहिती सामंत यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील विद्यापीठ, महाविद्यालय, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी यांच्या सुविधेसाठी ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ अमरावती’ हा उपक्रम पुढील महिन्यापासून सुरू करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमामुळे पालक, विद्यार्थी तसेच शिक्षण विभागातील कर्मचारी यांना आपल्या कामानिमित्त वारंवार मुंबईला मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण अमरावतीमध्येच होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या विभागाची प्रक्रिया विद्यार्थी आणि पालकांसाठी जास्तीत जास्त सोयीची कशी होईल, यासाठी मंत्रालय स्तरावर पूर्ण प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली असून लवकरच त्याचे परिणाम दिसू लागतील, असे मंत्री सामंत म्हणाले.
खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून होत असलेल्या शुल्क वसुलीबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने एक समिती तयार करण्यात आली असून ही समिती येणाऱ्या १५ दिवसांत विद्यार्थी, पालक आणि खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्यात सुवर्णमध्य साधून तोडगा निश्चित काढेल, असंही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.