Nagpur winter session : बांधकाम परवानगी देताय.. ; मग आता 'हेलिकॉप्टर' वापराची पण द्या..!

MLA aggressive due of fire : आग लागण्याच्या प्रकारावरुन विधान परिषद आमदार प्रसाद लाड आक्रमक..
MLA Prasad Lad
MLA Prasad LadSarkarnama
Published on
Updated on

Nagpur winter session : शहरातील नागरिकांची घरांची गरज भागविण्यासाठी महापालिका तसेच नगरपरिषदा यांच्याकडून सर्रासपणे बांधकाम परवानगी दिली जाते. परिणामी अनेक शहरांमध्ये उंच उंच इमारती उभ्या राहत असून काही दुर्घटना घडून या इमारतींना आग लागण्याचे प्रकार घडल्यास आग विझविण्यासाठी हेलिकॉप्टर वापरण्याची परवानगी द्यावी, अशी उपहासात्मक मागणी विधानपरिषदेत करण्यात आली.

नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध विभागांचे मंत्री, अधिकारी गेल्या चार दिवसांपासून नागपूर येथे ठाण मांडून बसले आहेत. विधानसभा तसेच विधानपरिषदेच्या सभागृहात अनेक महत्वपूर्ण विषयांवर आमदारांच्या चर्चा झडत आहेत.

MLA Prasad Lad
Sangali Swabhimani News : सांगलीत 'स्वाभिमानी'कडून 'वसंतदादा'चा 'काटा बंद'..!

विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार एकमेकांचे आरोप प्रत्यारोप करत टीकेची झोड उठवित आहेत. मुंबई, पुणे यासह राज्यातील प्रमुख शहरांचा विस्तार झपाट्याने होत असून जागोजागी गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. मात्र या इमारतींमध्ये अनेकदा अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याबद्दल विधानपरिषदेत आमदारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

सभागृहात भाजपचे आमदार प्रसाद लाड Prasad Lad यांनी एमएमआरडीएतील आगीच्या विविध घटनांचा दाखल देत राज्य सरकार आणि महापालिका आगीच्या घटना टाळण्यासाठी काय उपाय योजना करणार, या इमारतीमधील फायर ऑडिट बाबत काय निर्णय घेणार असे अनेक प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले होते. मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात उत्तरे दिली.

ते म्हणाले की, मोठ्या सोसायट्या तसेच व्यावसायिक आस्थापना यांचे फायर ऑडिट करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना केली जाईल. ही पथके अचानक भेटी देऊन तपासणी करतील. तसेच वर्षातून दोनवेळा उंच इमारतींचे ऑडिट केले जाईल. मुंबईसह अनेक शहरांमध्ये अनेक उंच इमारती उभ्या राहत असून इमारतींना आग लागल्यास नियंत्रण मिळविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याबाबतचा निर्णय घेण्याची गरज आहे, असे मत सदस्यांनी मांडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर फायर ऑडिट बाबत राज्यासाठी एकच धोरण राबविण्याची मागणी जयंत पाटील केली. आमदार प्रवीण दरेकर यांनी बोगस प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरली होती.

Edited By : Amol Sutar

MLA Prasad Lad
Shivsena News : सुषमा अंधारे करणार आज सुहास कांदेंवर हल्लाबोल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com