नगर जिल्हा 200 च्या उंबरठ्यावर ! एकाच दिवशी आढळले 18 कोरोना रुग्ण

आजच्या अहवालातनगर शहरातील सात, शेवगाव तालुक्‍यातील चार, पारनेर व संगमनेरचे प्रत्येकी दोन, राहाता, केडगाव आणि पाथर्डीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 195वर पोचला आहे.
Corona6
Corona6
Published on
Updated on

नगर : नगरमध्ये गेल्या 15 दिवसांत सातत्याने कोरोनाचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाचीही झोप उडाली आहे. एकामागून एक हॉटस्पॉट वाढत असल्याने जिल्हावासीयांच्या चिंतेतही भर पडत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

आजच्या अहवालात नगर शहरातील सात, शेवगाव तालुक्‍यातील चार, पारनेर व संगमनेरचे प्रत्येकी दोन, राहाता, केडगाव आणि पाथर्डीतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 195वर पोचला आहे. दरम्यान, आठ जणांना बूथ हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज दिला असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 90 झाली आहे. 

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यापासून नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आज दुपारी प्राप्त अहवालात सहा नवीन रुग्ण आढळले, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधित व्यक्तींमध्ये राणेगाव (शेवगाव) येथील 32 वर्षांचा युवक, लालानगर (केडगाव) येथील 50 वर्षांची महिला, भाळवणी (पारनेर) येथील दहा वर्षांची मुलगी, मुंबईहून घुलेवाडीला (पारनेर) आलेली 28 वर्षांची महिला, संगमनेरच्या कोल्हेवाडी रस्ता परिसरातील दीड वर्षीय मुलगी व नवघर गल्लीतील 32 वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. 

सायंकाळी प्राप्त अहवालानुसार आणखी बारा रुग्णांची त्यात भर पडली. त्यात राहाता येथील 29 वर्षांच्या युवकाला बाधा झाली. तो पूर्वी बाधित असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहे. माळीवाडा (नगर शहर) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली. ते सर्व जण यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील आहेत. त्यात चार महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय मार्केट यार्ड परिसरातील 37 वर्षीय महिला, लालानगर (केडगाव) येथील 55 वर्षांचा पुरुष, शहर टाकळी (शेवगाव) येथील 60 वर्षीय व्यक्ती, मुंबईहून शेवगाव येथे आलेला 55 वर्षांचा पुरुष व 50 वर्षांची महिला (पती-पत्नी), मुंबईहून चिंचपूर इजदे (ता. पाथर्डी) येथे कुटुंबीयांसह आलेला 48 वर्षीय पोलिस कर्मचारी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. 

आणखी आठ जण कोरोनामुक्त 

बूथ हॉस्पिटलमधून आणखी आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यात नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहुरी, पारनेर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना निरोप दिला. 

माळीवाडा, मोना प्लॉट हॉटस्पॉट 

नगर शहरातील माळीवाडा व संगमनेर शहरातील मोना प्लॉट ही दोन ठिकाणे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हॉटस्पॉट क्षेत्र घोषित केली. या दोन्ही ठिकाणी 17 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. माळीवाडा हॉटस्पॉट क्षेत्रात फुलसौंदर चौक, माळीवाडा, पंचपीर चावडी, जुना बाजार रस्ता, बारा तोटी कारंजा, इवळे गल्ली चौक, वरवंडे गल्ली, सौभाग्य सदन, विळदकर गल्ली, पार गल्ली, विशाल गणपती मंदिराची उत्तर बाजू, आशा प्रोव्हिजन स्टोअर्स, फुलसौंदर चौक या परिसराचा समावेश आहे, तर बफर झोनमध्ये संत कैकाडी महाराज व्यापारी संकुल, बगदादी खानावळ, खाटीक गल्ली, सवेरा हॉटेल, नागरे गल्ली, माणकेश्‍वर गल्ली, भिस्त गल्ली, शेरकर गल्ली, गोंधळे गल्ली, इवळे गल्ली, कौठीची तालीम, देवकर गल्ली, अमन पाटील रस्ता, माळीवाडा वेस, भोपळे गल्ली, संत कैकाडी महाराज संकुल या परिसराचा समावेश आहे. संगमनेरमधील मोना प्लॉट व वाबळे वस्तीचा हॉटस्पॉटमध्ये समावेश आहे. बफर झोनमध्ये कोल्हेवाडी रस्त्याचा समावेश आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com