नांदेड जिल्हा बॅंक अखेर अशोक चव्हाणांनी ताब्यात घेतलीच..

जिल्हा बॅंकेवर पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणजेच महाविकास आघाडीने वर्चस्व राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.
Nanded District Bank- Pratap chikhlikar- Ashok Chavan news
Nanded District Bank- Pratap chikhlikar- Ashok Chavan news
Published on
Updated on

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेक चव्हाण व भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाणांची सरशी झाली आहे. कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने अपेक्षेप्रमाणे जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवले आहे. चिखलीकर पिता-पुत्र विजयी झाले असले तरी त्यांच्या पॅनलाला मात्र दणका बसला आहे. अखेर अशोक चव्हाण यांनी जिल्हा बॅंक ताब्यात घेतल्याने महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

जिल्हा बॅंकेच्या २१ पैकी १८ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. आज मतमोजणीचे निकाल हाती आले, तेव्हा बॅंकेत परिवर्तन होऊन महाविकास आघाडी प्रणित पॅनलची सरशी होणार असेच दिसत होते. अंतिम निकाल हाती आले तेव्हा जिल्हा बॅंकेची सत्ता महाविकास आघाडी पर्यायाने अशोक चव्हाण यांच्याच हातात गेल्याचे स्पष्ट झाले.

महाविकास आघाडीतील कॉग्रेस- १२, शिवसेना- १, तर राष्ट्रवादीला-४ जागा मिळाल्या. म्हणजेच महाविकास आघाडीच्या पॅनलला २१ पैकी १७ जागा मिळाल्याने बॅंकेवर या पॅनलची एकहाती सत्ता आली. भाजप प्रणित पॅनलला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. यापैकी कॉग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर हे बिनविरोध निवडणून आले आहेत.

जिल्हा बॅंकेवर पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणजेच महाविकास आघाडीने वर्चस्व राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. गेल्यावेळी भाजपने कॉग्रेसला एकाकी पाडत जिल्हा बॅंकेची सत्ता मिळवली होती. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना अशोक चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेत परिवर्तन घडविण्यासाठी कंबर कसली होती.

जिल्हा बॅंकेची निवडणुक यावेळी चांगलीच चर्चेत आली होती, ती म्हणजे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारी अर्जाला विरोधी गटाकडून आव्हान देण्यात आल्यामुळे. पण हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि शेवटी चिखलीकरांना दिलासा देणारा निर्णय आला. निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे चिखलीकरांनी सत्तेसाठी जोरदार तयारी केली. पण राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने त्याचा परिणाम या निवडणुकीतही दिसून आला.

विजयी उमेदवार..

गोविंदराव शिंदे - १८, बाबुराव कदम- २३, प्रवीण पाटील चिखलीकर - १६, प्रताप पाटील चिखलीकर - ४५, भास्करराव पाटील चिखलीकर - बिनविरो,वसंतराव चव्हाण - २८, विजयसिंह देशमुख - ३४, श्‍याम कदम- ४, नागेश पाटील आष्टीकर - बिनविरोध, बाळासाहेब पाटील - बिनविरोध, कैलास देशमुख - २५, हनमंत पाटील - १७, दिनकर दहिफळे- २६, राजेंद्र केशवे- १३, संगीता पावडे - ५३७, विजया शिंदे - ५९०, शिवराम लुटे - १०५, मोहन पाटील - १७८,सविता मुसळे - ५६६, हरिहर भोसीकर   ७०७ तर व्यंकट जाळणे यांना ६३९ मते मिळाली.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com