नागपूर : शहरातील वारांगणांची वस्ती गंगाजमुना सुरू ठेवावी, की बंद करावी, यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट आमनेसामने भिडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे Jwala Dhote आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे NCP's corporator Abha Pande समोरा-समोर आल्या आणि मोठा राडा झाला. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना जवळपास दीड तास गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी कुशलतेने परिस्थिती नियंत्रणात आणली. The police skillfully brought the situation under congtrol.
शहरातील गंगाजमुना वस्तीत गेल्या १० ऑगस्टपासून सुरू असलेल्या संघर्षाने काल उग्र रूप धारण केले. गंगाजमुना वस्तीवरून दोन्ही गटाच्या समर्थकांकडून वसाहत ठेवणे व हटविण्याबाबत जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची पोलिसांसोबतही बाचाबाची झाली. विशेष म्हणजे वस्तीचे समर्थन आणि विरोध करणारे कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या आभा पांडे यांचे गंगाजमुना वसाहत येथून हटविण्याला समर्थन आहे तर राष्ट्रवादीच्याच पदाधिकारी व गंगाजमुना बचाव समितीच्या ज्वाला धोटे यांचा मात्र या वारांगना महिलांचे पुनर्वसन केल्याशिवाय परिसर सील करण्याला विरोध आहे.
भाजपचे नगरसेवक मनोज चाफले आणि वंदना यंगटवार यांनीही या वस्तीमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास बघता ती हटविण्याला समर्थन दर्शवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गेल्या काही दिवसांपासून गंगा जमुना वस्ती सील करण्याच्या पोलिसांच्या कारवाई विरोधात आंदोलन करत आहेत. १५ ऑगस्टला धोटे यांनी वस्तीत जाऊन पोलिसांनी लावलेले सर्व बॅरिकेट्स फेकून दिले होते. रविवारी रक्षाबंधनाच्या निमित्ताने ज्वाला धोटे पुन्हा गंगा जमुना वस्तीत पोहोचल्या आणि त्यांनी वारांगनांकडून रक्षासूत्र बांधून घेत मी तुमची रक्षा करेन असे आश्वासन दिले.
ही बातमी पण वाचा ः जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री उपरे, बाटगे आहेत ; शिवसेनेचा 'प्रहार'
त्यानंतर त्या पुन्हा पोलिसांनी लावलेल्या बेरिकेड्सची तोडफोड करत वस्ती खुली करण्याचा प्रयत्नात होत्या. परंतु त्याचवेळी वस्ती हटवण्याला समर्थन असलेल्या आभा पांडे समर्थकांसह तेथे आल्या. येथे भाजपचे नगरसेवकही आले. त्यानंतर दोन्ही गटांत त्यांच्या मागणीबाबत जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. तर दोन्ही गटांकडून एकमेकांना शिवीगाळी केली गेली. त्यात दोन्ही गट भिडू नये म्हणून पोलिस मोठ्या संख्येने बॅरीकेड असलेल्या भागात मधात उभे झाले. त्यानंतर कधी आंदोलकांच्या दोन गटाची तर कधी आंदोलकांची पोलिसांशी बाचाबाची झाली. पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने मोठी घटना टळली.
रेड लाइट म्हणून प्रचलित या वस्तीत दोन हजार महिला व तरुण मुली वेश्याव्यवसाय करतात. परंतु १० ऑगस्ट रोजी पोलिसांनी या वस्तीत छापा घातल्यानंतर अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतले जात असल्याचे निदर्शनात आले. हा गंभीर प्रकार बघत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगा जमुना वस्तीत अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतले जात असल्याचा ठपका ठेवत वस्ती सील केली. मात्र ज्वाला धोटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आधी येथील महिलांचे पुनर्वसन करा अशी मागणी करत आंदोलन सुरू केले आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.