अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह सुमारे हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडावे या मागणीसाठी अॅड आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आदेश जारी केला आहे. प्रतिबंधात्मक आदेश असतानाही आंदोलनाच्या वेळी मोठा जमाव गोळा झाला होता
Offence registered against Prakash Ambedkar for Pandharpur Agitation
Offence registered against Prakash Ambedkar for Pandharpur Agitation

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाउनच्या प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात असताना जमाव जमवून, मास्क न घालता, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करता आंदोलन केल्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे यांच्यासह अकराशे ते बाराशे लोकांवर पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी उघडावे या मागणीसाठी अॅड आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काल दुपारी आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आदेश जारी केला आहे. प्रतिबंधात्मक आदेश असतानाही आंदोलनाच्या वेळी मोठा जमाव गोळा झाला होता. आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे (रा.मुक्ताबाई मठ, पंढरपूर), आनंद चंदनशिवे (रा. सोलापूर), धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, रेखाताई ठाकूर, नाम महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड (रा. पंढरपूर), रवि सर्वगोड, गणेश महाराज शेटे (रा.अकोला), माऊली हळणवर (रा. इश्वरवठार, ता.पंढरपूर) आणि इतर अकराशे ते बाराशे जणांनी मास्क न घालता, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही.

त्याची दखल घेऊन संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन मोठ्याने घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्सेटबल परशुराम माने यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सहायक पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड तपास करीत आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com