उस्मानाबाद ः कोरोनामुळे स्थगिती मिळालेल्या राज्यातील ६० हजाराहून अधिक सहकारी संस्थाच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ३१ आॅगस्ट पर्यंतचे स्थगिती आदेश उठवण्यात आल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या निवडणुका देखील घेण्यात येणार आहे. (Osmanabad district banks under BJP's control? That Mahavikas Aghadi will be the glue.) मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूका न्यायालयाच्या आदेशानूसार या आधीच घेण्यात आल्या. आता लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्हा बॅंकाचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होईल.
उस्मानाबाद जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थावर आतापर्यंत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वर्चस्व होते. (Bjp Mla Rana Jagjeetingh Patil, Osmanabad) पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवलेले आणि पराभूत झालेले राणाजगजितसिंह पाटील विधानसभेच्या वेळी भाजपमध्ये गेले. (Osmanabad District Coprative Bank) तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का बसला.
शिवसेना-काॅंग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बॅंक गेल्यावेळी भाजपशी आघाडी करून राष्ट्रवादीने ताब्यात घेतली होती. अर्थात याचे सुत्रधार राणा पाटील हेच होते. आता ते भाजपमध्ये आणि जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा तर उपाध्यक्ष भाजपचा अशी परिस्थिती आहे. आता नव्याने होणाऱ्या निवडणुकीत सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थावर राणा पाटलांचे असणारे वर्चस्व त्यांना जिल्हा बॅंकेची संपुर्ण सत्ता मिळवून देणार? की मग महाविकास आघाडी बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्याचे चित्र गुंतागुतीचे आहे असेच म्हणावे लागेल.
राजकीय घडामोडींमुळे चित्र बदलले..
जिल्हा बँकेवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सदस्यांची संख्या जास्त आहे, पण अध्यक्ष असलेले सुरेश बिराजदार हे राष्ट्रवादीत आहेत. तरी देखील राणा पाटील हेच सत्तेचे सुत्रधार असल्याचे दिसते. .सध्या उपाध्यक्षपदी भाजपचे कैलास शिंदे हे असल्यामुळे राणा पाटलांनी तशा अर्थाने सत्तेच्या दोऱ्या आपल्याच हातात ठेवल्याचे पहायला मिळते. आता येणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येणार का? यावर देखील बरेचसे अवंलबून आहे.
शिवसेनेचा एक गट पक्षाबरोबर आहे, तर उमरगा मतदारसंघ व प्रा. तानाजी सावंत यांनी राणा पाटलाबरोबर जुळवुन घेतल्याने त्यांचे हे सख्य जिल्हा बॅंकेत काय कमाल करते याकडे सगळ्याचे लक्ष असणार आहे. राष्ट्रवादीत अजुनही राणा पाटील यांच्याबद्दल टोकाचा विरोध दिसत नाही. तर काँग्रेसची भूमिका अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळं सध्यातरी भाजपच वरचढ ठरणार असे चित्र आहे.
उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेत राष्ट्रवादी-भाजप पॅनलचे ९ संचालक आहेत. यापैकी ८ एकट्या राष्ट्रवादीचे तर एक भाजपचा आहे. असे असले तरी बँकेवर राणा पाटलांचे वर्चस्व कायम आहे. शिवसेना-काँग्रेसच्या पॅनेलला सहा जागा मिळाल्या होत्या. दरम्यान गेल्या दीड-दोन वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात अनेक घडमोडी घडल्या. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा अंदाज सध्या तरी बांधणे कठीण दिसते.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.