मंत्री उदय सामंत यांची कोरोना बैठकीतील फोटोग्राफी चर्चेत

माजी आमदार नातूंची टीका
uday samant photography
uday samant photography
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप वाढत असताना दुसरीकडे उच्च शिक्षमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची फोटोग्राफी विरोधकांच्या डोळ्यावर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना नेमके कसं वागलं पाहिजे, याचे प्रशिक्षण दिले गेले की नाही, असा प्रश्न माजी आमदार विनय नातू यांनी उपस्थित केला. (Ex MLA VInay Natu criticizes photography by minister Uday Samant)

रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाला दोन फोटोग्राॅफी कॅमेरे सरकारकडून देण्यात आले. ते मंत्री सामंत यांच्या हस्ते आणि खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत देण्यात आले. त्याच वेळी सामंत यांनी जिल्हाधिकारी आणि राऊत यांचा एकत्रित फोटो क्लिक केला. त्यावरून नातू यांनी टीका केली आहे.

नातू म्हणाले की स्वतःच्या बदली विषयावर ते स्वतःच वक्तव्य करणारे हे  जिल्हाधिकारी आहेत. मंत्र्याच्या पत्रकार परिषदेनंतर फोटोग्राफीसुद्धा करतात आणि फोटोग्राफी करताना जनतेला दाखवून देतात की सोशल डिस्टसिंग नाही केले तरी चालेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय लेखाजोखा मांडण्याकरता काल जी पत्रकार परिषद होती मग या पत्रकार परिषदेत इतक्या जवळून फोटोसेशन कशासाठी केले? सर्वांना दाखवून देण्यासाठी जिल्हाधिकारी असे करतात का, असा सवाल त्यांनी केला.

जिल्हा प्रशासनाला असे वाटतंय की आम्हाला सर्व समजत आहे. मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकांत सर्वत्र सोशल डिस्टंसिंग फज्जा उडत आहे. दुसरीकडे  बाजारात जनतेकडून सोशल डिस्टंसिंग होत असल्याची टीका हे प्रशासन करते. हे  प्रशासन नेमके चालवतोय कोण? जिल्हाधिकार्‍यांना हे प्रशासन स्वतः चालवायचे का कुणाच्या तरी हातात चालवायला दिलेले आहे आणि  तेकळसूत्री बाहुली जिल्हाधिकारी काम करतात, असा प्रश्न निर्माण होत आहे, असा टोला विनय नातू लगावला आहे.

ही पण बातमी वाचा : सिंधुदर्गमध्ये कडक निर्बंध : उदय सामंतांची घोषणा

सिंधुदुर्गात बाहेरून आलेल्यांची संख्या दोन लाख झाली आहे. `माझे कुटुंब, माझी जबाबदारी` या योजनेनुसार `माझे सिंधुदुर्ग, माजी जबाबदारी` ही योजना सुरू केली. या योजने अंतर्गत ५० जण पाँझिटिव्ह आढळले, अशी माहिती तेथील पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ते म्हणाले, `` सिंधुदुर्गमध्ये नऊ मे रोजी रात्री १२ पासून सकाळी ७ पर्यंत लाँकडाऊन राहणार आहे. संपूर्ण जिल्हा लाँकाडऊन असणार आहे. डेअरी, बेकरी, किराणामाल, प्राण्याची खाद्यपदार्थ, भाजीपाला दुकानं बंद राहतील, या दुकान मालकांना घरपोच सेवा पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तेही सकाळी ७ ते ५, रेशन दुकान ७ ते ११ या वेळेत धान्य वाटप करण्यास परवानगी राहील. शिवभोजन ११ ते २ वेळेत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्यांणा चाचणी करूनच प्रवेश दिला जाईल. त्यानंतर १४ दिवस क्वारंटाइन व्हावं लागेल. पर्यंटकांसाठीही सिंधुदुर्ग बंद राहणार. मेडिकल दुकानंही काही तासांसाठीच सुरू राहणार. सहा दिवस जिल्हाबंदी राहणार आहे. गेल्यावर्षी प्रमाणे जसा कडक लाँकडाऊन केला होता. त्या प्रमाणे हा कडक लाँकडाऊन करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनमध्ये कार्यक्रम, लग्न समारंभ यांना नियमानुसार परवानगी दिली जाईल़.``

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com