आमदार प्रकाश भारसाकळे म्हणतात "सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय'

आमदार भारसाकळे यांनी चौफेर फटकेबाजी करीत हिवरखेड परिसराच्या विकासाकरिता कटिबद्ध असल्याचे सांगून केलेल्या, मंजूर असलेल्या, मंजुरात आनणार असल्याच्या कामांची यादी वाचणे सुरू केले.
आमदार प्रकाश भारसाकळे म्हणतात "सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय'
Published on
Updated on

हिवरखेड : जिल्ह्याच्या राजकारणात वरचष्मा कुणाचा यावरून भाजप आणि भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमीच खटके उडतात. या दोन्ही पक्षात सुरू असलेल्या विकासकामांचा श्रेयवाद आणि कुरघोडीचे राजकारण हिवरखेड येथे पार पडलेल्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यातही पाहायला मिळाले. या कार्यक्रमात भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि भारिप-बमसंची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जमिरउल्ला खा पठाण यांच्यात विकास कामांवरून चांगलीच जुगलबंदी रंगली. आमदार भारसाकळे यांनी कोट्यवधी रुपयांची केलेली विकास कामांची यादी वाचत शेवटी हिवरखेडवासियांनो (सोनू) तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? असे म्हणत कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. 

आगामी लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता भाजप आणि भारिप बहुजन महासंघात जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. जिल्ह्यातील प्रलंबीत प्रश्न, विकासकामांवरून दोन्ही पक्षात जोरदार राजकीय कुरघोडी सुरू आहे. त्याचाच प्रत्यय हिवरखेड येथे प्रेस क्‍लबने घेतलेल्या गुणवंतांच्या कौतुक सोहळ्यात दिसून आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनीत लखोटीया होते. तर उद्‌घाटक म्हणून आमदार प्रकाश भारसाकळे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जमिरउल्ला खॉ पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

हिवरखेड परिसराच्या विकासाच्या मुद्यावर बोलताना जमिरउल्ला खान पठाण यांनी हिवरखेडचा जो विकास होतो आहे तो जिल्हा परिषदच्या बळावरच होत असून प्रमुख मार्गाच्या 25 लाख रुपयांच्या रस्त्यांसह विविध कामांसाठी कोट्यवधीचा निधी हिवरखेडसाठी जिल्हा परिषदेमार्फंत मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आमदार भारसाकळे यांनी चौफेर फटकेबाजी करीत हिवरखेड परिसराच्या विकासाकरिता कटिबद्ध असल्याचे सांगून केलेल्या, मंजूर असलेल्या, मंजुरात आनणार असल्याच्या कामांची यादी वाचणे सुरू केले. 

110 कोटींचा आडसुळ तेल्हारा हिवरखेड चंदनपूर 35 फूट रुंदीचा रस्त्याचा महाप्रकल्प, 45 लाखाचा चंडिका चौक रस्ता, 10 लाखाचे अण्णाभाऊ साठे सभागृह, 10 लाखाचे कब्रस्थान कंपाउंड, 8 लाख व्यायामशाळा साहित्य, 15 लाख पाईप लाईन, 10 लाख इंदिरा नगर रोड तसेच अनेक वर्षांपासून मंजूर असलेला बहुप्रतिक्षित 3 कोटी 66 लाख रुपयांचा जलव्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावणे, यापैकी काही कामे पूर्ण झाली असून काही सुरू तर काही मंजुर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच वारखेड- हिवरखेड- अकोट- दर्यापूर या 240 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून निधी खेचून आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. एवढे करूनही सोनू (हिवरखेडवासी) तुमचा माझावर भरोसा नाय काय? नाही काय? नाही काय? असे म्हणताच कार्यक्रमात एकच हशा उडाला. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com