औरंगाबाद ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा साजरा न होणारा पहिला वाढदिवस. राज्यावर कोरोना, चक्रीवादळ, पूर आणि आता दरड कोसळून झालेली जीवीतहानी असे एकापोठोपाठ अनेक संकट येत असल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उध्दव साहेबांनी घेतला आहे. (Publicity, away from discussion, but leadership that impresses from work) संकटांना तोंड देत राज्यातील जनतेला यातून बाहेर काढण्यासाठी ते रात्रंदिवस झटत आहेत.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, उध्दव साहेब मुख्यमंत्री झाले. शांत स्वभाव, कुठलाही प्रशासकीय अनुभव नाही, अशी व्यक्ती राज्य कारभार कसा चालवणार? असा प्रश्न अनेकांना पडला. (Shivsena Mla Sanjay Shirsath Birthday Wish Chief Minister Uddhav Thackeray) बाळासाहेबांनतर उध्दव ठाकरे शिवसेना कशी सांभाळणार असेही बोलले गेले. पण त्यानंतर झालेल्या मुंबई महापालिका व राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपलं नाणं खणखणीत असल्याचे सिद्ध करून दाखवले.
शिवसेना पक्षप्रमुख म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळत असतांना आता ते मुख्यमंत्री म्हणून देखील महाराष्ट्र अगदी चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. राजकारणात टीका, आरोप-प्रत्यारोप, अरे ला का रे, सुडाचे राजकारण अशा गोष्टी पहायला मिळतात. पण प्रत्येक टीकेला, टीका करणाऱ्याला उत्तर दिलेच पाहिजे हा समज उध्दव साहेबांनी खोटा ठरवला. टीका करणाऱ्यांना ती करू द्यावी, आपण त्याकडे दुर्लक्ष करून काम करत रहायचं हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यामुळेच गेल्या दोन वर्षात त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहचलेला नाही.
कोरोना काळात देखील त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली गेली, पण त्याला फारसे महत्व न देता त्यांनी राज्याला आणि जनतेला कोरोनाच्या संकटातून समर्थपणे बाहेर काढले. कोरोना संकटामुळे राज्यात फार काम करता आले नाही, हे जरी सत्य असले तरी या संकट काळात त्यांनी प्रशासकीय यंत्रणा सक्षमपणे हाताळत या महामारीतून लोकांना वाचवले. प्रसिद्धी किंवा चर्चेत राहण्यासाठी मुख्यमंत्री कुठलेही काम करत नाहीत. त्यांना प्रसिद्धीचा सोस नाही, या उलट आपल्या कामातून ठसा उमटवून चर्चेत राहणे त्यांना अधिक आवडते. त्याचे अनुकरण आम्ही लोकप्रतिनिधीही करतो.
गेल्या दोन वर्षात मंत्रालयातील सहाव्या मजल्याच्या दालनात मी त्यांना कधी पाहिले नाही. मुख्यमंत्री म्हणून सहावा मजला आणि तेथील दालनाची अनेकांना भुरळ असते पण उध्दव साहेब कधीच त्यात अडकून पडले नाही. मंत्रालयात न येता देखील प्रशासकीय यंत्रणा हाताळता येते, लोकांचे प्रश्न सोडवता येतात हे त्यांनी दाखवून दिले. सत्तेची हवा डोक्यात न जाऊ देता त्यांनी अगदी शांत आणि संयमाने राज्याती धुरा सांभाळली. पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी, राज्यातील सर्वसामान्यांसाठी काय करता येईल याचाच विचार कायम ते करत असतात.
फरफटत जाणे मान्य नाही..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात कधी तडजोड केली नाही, कुणासोबत फरफटत जाणे त्यांना मान्य नव्हते. पण माझा पक्ष टिकला पाहिजे, यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी साहेबांनी स्वीकारल्या. विशेष म्हणेज राजकारण शांतपणे देखील करता येते हे त्यांना महाराष्ट्राला दाखवून दिले. राजकारणात काही चुका निश्चित झाल्या असतील, पण त्या अजानतेपणात झालेल्या आहेत, त्या मुद्दाम केलेल्या नाहीत हे ही खरे.
उद्धव साहेबांचा आणखी एक गुण वाखाणण्या जोगा म्हणावा लागेल आणि तो म्हणजे केवळ घोषणा करण्यावर त्याचा विश्वास नाही. घोषणा केल्यानंतर त्याची अमंलबजावणी देखील तितक्या प्रभावीपणे झाली पाहिजे, याकडे त्यांच्या कटाक्ष असतो. घोषणा आणि अंमलबजावणी यात फरक न करणारा असा हा नेता आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोना काळात त्यांच्या संकल्पनेतून राबवल्या गेलेल्या शिवभोजन थाळी योजनेवर टीका केली गेली. पण ज्यांची पोटं भरलेली होती, अशा लोकांनी ही टीका केली. उध्दव साहेबांनी गरीबाच्या पोटात दोन घास घालण्याचे मोठे काम केले हे नाकारून चालणार नाही.
मी तुझा बाॅस..
शिवसेनेत मी गेली ३७ वर्ष काम करतोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत, सहवासात आमची राजकीय जडणघडण झाली. उद्धव साहेब तेव्हा राजकारणात नव्हते. बाळासाहेबानंतर जेव्हा त्यांनी पक्षाची धुरा हाती घेतली तेव्हाचा एक प्रसंग मला आठवतो. पैठण येथे साखर कारखान्याच्या गळीत हंगामासाठी उध्दव साहेब आले होते. तेव्हा माझ्यावर नुकतीच अॅन्जीओप्लास्टी झालेली होती. पण साहेबांसोबत मी त्या कार्यक्रमाला हजर होतो.
साहेबांच्या शेजारी बसलो तेव्हा ते मला म्हणाले, संजय आता मी तुझा बाॅस आहे. अचनाक ते असं बोलल्यामुळे मी विचारात पडलो, साहेब असं का म्हटले असतील. तेव्हा ते म्हणाले, तुझ्या हद्यात एक स्टेन आहे, आणि माझ्या सात मग मी तुझा बाॅस झालो की नाही. त्यांचा हा मिश्किल स्वभाव देखील तेव्हा मी अनुभवला होता. अशा या माझ्या नेत्याच्या हातून महाराष्ट्राची सेवा अशीच घडत राहो, त्यांना ईश्वर दिर्घायुरारोग्य देवो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो.
(शब्दांकन ः जगदीश पानसरे)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.