रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर मागण्यांचा पाऊस; चिखलीकरांचेही निवेदन..

नांदेडचा गुरुद्वारा, तिरुपती बालाजी हे जगप्रसिद्ध धार्मिकस्थळे रेल्वेला जोडल्यास भाविकांना सोयीचे ठरेल. त्यामुळे रॉयलसीमा एक्सप्रेस नांदेडहून सोडावी.
Bjp Mp Chiklikar letter to Minister Raosaheb Danve News Nanded
Bjp Mp Chiklikar letter to Minister Raosaheb Danve News Nanded

नांदेड : जालना लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा प्रतिनिधित्व करणारे खासदार रावसाहेब दानवे यांना रेल्वे-कोळसा आणि खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली.  सहाजिकच मराठवाड्यातील वर्षानुवर्षे रखडलेली विकासकामे, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, रेल्वे गाड्यांची संख्या, नवे मार्ग आता मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (Rain of demands on Minister of State for Railways Raosaheb Danve; Chikhalikar's statement too) त्यामुळे सध्या रावसाहेब दानवे यांच्यावर मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नासंदर्भातील मागण्यांचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकतीच त्यांनी रेल्वे मंत्रालयात भेट घेऊन जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नांचे निवेदन देऊन मागण्या केल्या आहेत.

देशाच्या रेल्वे खात्यावर स्वातंत्र्यकाळापासूनच उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या राज्यांच्या प्रभाव राहिला आहे. (Central State Railway Minister Raosaheb Danve) केंद्रीय आणि राज्यमंत्री ही दोन्ही पद सर्वाधिक काळ याच राज्याकडे होती. महाराष्ट्राला अपवादानेच रेल्वे खात्याचा पदभार मिळाला. परंतु नुकत्याच झालेल्या मोदी मंत्रीमंडळ विस्तारात पहिल्यांदा मराठवाड्यातील व्यक्तीची रेल्वे राज्यमंत्रीपदी वर्णी लागली.

चिखलीकरांनी दानवे यांच्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याच्या विकासात भर पडण्यासाठी आणि दळणवळणाची नवी साधने उभारण्यासाठी बोधन-मुखेड-लातूर रोड व किनवट - माहुर - पुसद या नव्या रेल्वेमार्गाची निर्मिती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. (Bjp Mp Prtaprao Patil Chikhlikar Nanded)  किनवट - माहूर - पुसद असा नवीन रेल्वे मार्ग निर्माण करावा, नांदेड - हदगाव - पुसद - यवतमाळ - वर्धा या मार्गाला मंजुरी मिळाली असून त्या कामाला लवकर सुरुवात करावी.

शिवाय किनवट - माहूर - पुसद असा नवीन मार्ग मंजूर झाल्यास आदिवासी भागाचा विकास होऊ शकतो. तसेच  माहूर तीर्थक्षेत्राच्या दर्शनाचा लाभ भाविकांना सोयीचा होईल. तसेच या भागातील व्यापार वाढण्यासही मदत होईल.  रेल्वे क्रमांक १२७२८ आणि १२७३० नांदेड - पुणे एक्सप्रेस दररोज सुरू करावी.  

नांदेड-पुणे रेल्वे दररोज हवी..

नांदेड येथून दररोज पुणे येथे जाण्यासाठी खासगी वाहनांना गर्दी असते. सध्या या मार्गावर एकच रेल्वे धावत असून ती पुरेशी नाही. त्यामुळे नांदेड - पुणे - नांदेड व्हाया औरंगाबाद - मनमाड ही एक्सप्रेस दररोज सुरू करणे गरजेचे आहे.
त्याचबरोबर रेल्वे संख्या १२७९३ आणि १२७९४ रॉयलसीमा एक्सप्रेस निजामबाद ऐवजी नांदेडहून सोडावी, असे झाल्यास नांदेड जिल्ह्यातील भाविकांना तिरुपती येथे जाण्यासाठी सोयीचे होईल याकडेही चिखलीकर यांनी दानवे यांचे लक्ष वेधले.

नांदेडचा गुरुद्वारा, तिरुपती बालाजी हे जगप्रसिद्ध  धार्मिकस्थळे रेल्वेला जोडल्यास भाविकांना सोयीचे ठरेल. त्यामुळे रॉयलसीमा एक्सप्रेस नांदेडहून सोडावी, राज्यराणी एक्सप्रेसला अतिरिक्त सहा डबे जोडावेत. सध्या रेल्वेला दररोज गर्दी होत असून अतिरिक्त डबे जोडल्यास मराठवाड्यातील प्रवाशांची सोय होईल, असेही चिखलीकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com