... तर 1 डिसेंबरनंतर सरकारशी असहकार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

... तर 1 डिसेंबरनंतर सरकारशी असहकार, सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
Published on
Updated on

कोल्हापूर : कोपर्डीच्या बहिणीला न्याय मिळण्यापूर्वी जल्लोष करायचा कसा, असा प्रश्न सकल मराठा समाजाच्या बैठकीत आज उपस्थित करण्यात आला. खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणाची बाजू ताकदीने मांडावी, अशी मागणीही करण्यात आली. तीस नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर एक डिसेंबरनंतर सरकारची असहकार आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. शासकीय विश्रांतीगृह येथे बैठक झाली. 

उमेश पोवार म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी सरकारकडे समाजाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. विविध कामांमुळे ते बैठकीस 
उपस्थित राहिले नसले तरी ते समाजाबरोबर आहेत. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जल्लोष करा, हा चुकीचा शब्द वापरला आहे. जोपर्यंत कोपर्डीच्या बहिणीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी जल्लोष करा असा म्हणू नये. त्यापेक्षा आरक्षणासह अन्य मागण्यांचाही गांभीर्याने विचार करावा. बाळासाहेब पाटील म्हणाले,"राज्यात मराठा आमदार आहेत. त्या सर्वांनी एकत्र येऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मराठा आरक्षणाचा अहवाल तयार झाला आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पण, सरकारने आता समाजाची फसवणूक करु नये. 

विनोद साळोखे म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतलेले नाहीत. जोपर्यंत कोपर्डीच्या बहिणीला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही जल्लोष करु शकणार नाही. खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित अमर पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाची बाजू ताकदीने मांडली असून, ते आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिनिधी भगवान काटे यांनी मराठा समाजात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून आम्ही आरक्षणासाठी आग्रही आहोत. आरक्षणाची मागणी खासदार राजू शेट्टी लावून धरत असल्याचे सांगितले. 
यावेळी आमदार अमल महाडिक यांचे प्रतिनिधी मकरंद बोराटे, संदीप पाटील, फत्तेसिंह सावंत, नगरसेवक प्रताप जाधव, गणी आजरेकर, अनिकेत चव्हाण, जयकुमार शिंदे, अमोल गायकवाड उपस्थित होते. 

बैठकीतील अन्य मुद्दे असे... 
- मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जाहीर करावा 
- मराठा आरक्षणाचा कायदा करून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे 
- मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी मागे घ्यावेत 
- कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com