
अकोला : निसर्गाच्या अवकृपेमुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांना सहन करावा लागतो, यंदाही अपेक्षीत पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यामुळे हे विघ्नहर्ता माझ्या शेतकरी बांधवांचे सर्व दुखः दूर करून त्यांना सुखी कर, असे साकडे भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांनी गणपती बाप्पाला घातले.
गणेश उत्सव म्हणजे प्रत्येकाच्या घरात आनंद, उत्साह आणि भक्तीभावाचा सण. या दिवशी खासदार संजय धोत्रे यांच्या घरी सर्व कुटुंबिय एकत्र येत उत्साहात गणरायाचे स्वागत केले. वेदपाठी ब्राम्हणांचा मंत्रोच्चार, धूप, दीप आणि विविध सुंगधी फुलांनी सजविलेल्या आसनावर श्रीगणेशाला विराजमान करण्यात आले. दररोज सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया चा जयघोष करीत खासदार धोत्रे, सौ. सुहासिनीताई धोत्रे, मुलगा अनुप, सुष्ना समिक्षा आणि नात यशिका यांच्यासह सर्व कुटुंबीय पूजा, अर्चना करतात.
खासदार धोत्रे यांचे पुत्र नकुल आणि अनुप ही भावंडे मोठ्या उत्साहात गणपतीची मनोभावे पूजा करीत. मात्र, नकुल आणि त्यांची पत्नी धारा हे नोकरीनिमित्त अमेरिका येथे स्थायीक असल्याने गणपती उत्सवात त्यांची प्रकर्षाने आठवण येत असल्याचे खासदार धोत्रे व सुहासिनीताई यांनी सांगितले. यावर्षी सुहासिनीताई व समिक्षा यांनी गणरायासाठी विविध फुलांनी सजविलेली आरास चर्चेचा विषय ठरली. दररोज गणपतीला आवडणाऱ्या मोदकाचा नैवेद्य दाखविण्यात येतो.
गणेश वंदना करतांना खासदार धोत्रे यांनी यंदा श्री गणेशाकडे शेतकरी बांधवांना सुख, समृद्धी देण्याची प्रार्थना केली. राज्यातील शेतकरी, मजूर, कामगार, व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास होऊन, संपूर्ण महाराष्ट्र राज्याची विकासाकडे आगेकूच होऊ दे, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.