मित्रा, तुझा अभिमान वाटतो : शरद पवार यांनी केले अभिनंदन

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला २०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
Sharad Pawar-Poonawala
Sharad Pawar-Poonawalasarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला २०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावर्षी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार ४ जणांना जाहीर झाला आहे. तर पद्मभूषण पुरस्कार १७ जणांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पद्मश्री हा पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे.

यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पुनावाला (Cyrus Poonawala) यांनी कोरोना (Covid-19) काळात केलेले काम आणि कोरोना प्रतिबंधक लस निर्मीतीत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्कराने (Padma Awards) सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पुरस्कर जाहीर झाल्यानंतर पुनावालांचे मित्र आणि राष्ट्रवादी कॅाग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचे ट्वीटरच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.

Sharad Pawar-Poonawala
Uddhav Thackeray : औरंगाबादकर महापालिकेवरचा भगवा कधी उतरू देणार नाही

पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, मित्रा, तुझा अभिमान वाटतो. औषध निर्मिती क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, अश्या शब्दात त्यांनी पुनावालांचे अभिनंदन केले आहे. पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते सध्या गृह विलीगीकरणात आहेत. मात्र, आपल्या मित्राला प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर होताच त्यांनी अभिनंदन केले आहे.

सिरम संस्थेचे प्रमुख पुनावाला हे पवार यांचे चांगले मित्र आहेत. दोघांचे शिक्षण हे पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात झाले आहे. पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो. त्यातूनच त्यांना लस निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला, असे बोलले जाते.

Sharad Pawar-Poonawala
गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी टाकलेल्या पत्रात एसटीचा उल्लेख...

पद्मविभूषण पुरस्कार

जेष्ठ गायिका प्रभा आत्रे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर उत्तर प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करण्यात आला आहे.

पद्मभूषण पुरस्कार

  • १. गुलाम नबी आझाद

  • २. व्हीक्टर बॅनर्जी

  • ३. गुरमित बावा (मरणोत्तर)

  • ४. बुद्धदेव भट्टाचार्य

  • ५. नटराजन चंद्रशेखरन

  • ६. क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला

  • ७. मधुर जेफरी

  • ८. देवेंद्र झांजरीया

  • ९. राशीद खान

  • १०. राजीव मेहेरश्री

  • ११. सुंदरंजन पिचाई

  • १२. सायरस पुनावाला

  • १३. संजया राजाराम (मरणोत्तर)

  • १४. प्रतिभा रे

  • १५. स्वामी सच्चिदानंद

  • १६. वशिष्ठ त्रिपाठी

पद्मश्री पुरस्कार

एकूण १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे, यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा सन्मान होणार आहे. यात डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर), हिंमतराव बाविस्कर, सुलोचना चव्हाण, डॉ. विजयकुमार डोंगरे, सोनू निगम, अनिलकुमार राजवंशी यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com