विनायक मेटे घसरले श्रीमंत मराठ्यांवर, म्हणाले...

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी (Vinayak Mete) महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार टीका केली आहे.
Vinayak Mete

Vinayak Mete

Sarkarnama

Published on
Updated on

नांदेड : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) लढाई ही गरीब मराठ्यांची आहे. श्रीमंत मराठ्यांची नाही, असे वक्तव्य शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी (Vinayak Mete) केले आहे. राजकीय मराठा नेत्यांनी मराठ्यांचा वापर फक्त खुर्ची पर्यंत जाण्यासाठीच केला, अशी टीका त्यांनी केली आहे. ते आज (ता.2 जानेवारी) नांदेडमध्ये बोलत होते.

मेटे म्हणाले, श्रीमंत मराठा समाजाकडून फक्त मतदानापुरता गरीब मराठा समाजाचा वापर केला जात आहे. एकदा का खुर्ची मिळाली की त्यांना गरीब मराठा समाजाच्या समस्येचे काही घेणेदेणे नाही. त्यांच्याकडे कोणी बघत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी गरीब मराठ्यांनाच लढावे लागेल. ही लढाई श्रीमंत मराठ्याची नाही, असे म्हणत त्यांनी राजकारणात मोठ्या पदावर बसलेल्या राजकीय नेत्यांना टोला लगावला आहे.

यावळी मेटेंनी राज्यातील पेपरफुटीस राज्यसरकारला जबाबदार धरत याचे धागेदोरे हे मंत्रालयापर्य़ंत असल्याचे सांगत या घोटाळ्यास महाविकास आघाडी सरकारवर कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, सध्या गाजत असलेल्या वक्फ बोर्ड आणि देवस्थानाच्या जमिन घोटाळ्यातही मंत्रालयाचा हात असल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या काही महिन्यापासुन सैन्य भरती, आरोग्य भरतीचे पेपर फुटले तर, गैरव्यव्हार होणार हे लक्षात आल्याने गृहनिर्माण विभागाच्या वतीने घेण्यात येणारी म्हाडाची परिक्षा रद्द करण्यात आली आहे. या गैरव्यवहाराच्या चौकशी दरम्यान शिक्षक पात्रता परिक्षा म्हणजे टीईटी परिक्षेत सुद्धा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरळी आयुक्त तुकाराम सुपेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षांकडून चांगलीच टीका केली जात आहे. तसेच, राज्यातील देवस्थानच्या जमीनी व वक्फ बोर्डच्या जमीनी सुद्धा हडपल्याचे आरोप सत्तेतील काही नेत्यावर करण्यात आले आहेत. यावर सुद्धा मेटेंनी कडाडून टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com