राज्यात लस न घेणाऱ्यांची धक्कादायक संख्या; आरोग्य विभाग चिंतेत

आता दोन्ही डोस घेतलेल्यांनाच (Covid-19 vaccinators) सार्वजनिक वाहनातून प्रवास करता येणार आहे.
Covid-19 Vaccination
Covid-19 VaccinationSarkarnama
Published on
Updated on

पुणे : राज्यातील १८ वर्षांवरील नऊ कोटी १४ लाख व्यक्‍तींनी कोरोनावरील (Covid-19) प्रतिबंधित लस (Covid-19 Vaccination) टोचून घेणे अपेक्षित आहे. मात्र, १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु होऊनही अद्यापही राज्यातील जवळपास दोन कोटी व्यक्‍तींनी एकही डोस घेतलेला नाही. पहिला डोस घेऊन २८ दिवस किंवा ८४ दिवस पूर्ण होऊनही एक कोटी तीन लाख व्यक्‍ती दुसरा डोस घेण्यासाठी आलेच नाहीत. याबद्दल आरोग्य विभागाने (Department of Health) चिंता व्यक्‍त केली आहे.

Covid-19 Vaccination
आफ्रिकेतून हजार जण मुंबईत; आदित्य ठाकरेंनी दिली धक्कादायक माहिती

कोरोनाच्या दोन्ही लाटेत राज्यातील ६६ लाख ३५ हजार व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी तब्बल एक लाख ४१ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरी लाट ओसरल्यानंतर आता विषाणूचा 'ओमिक्रॉन' हा नवा प्रकार आला आहे. लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा ठोस उपाय असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्‍यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले, त्याठिकाणीच लसीकरण कमी असल्याचे समोर आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यांनतर कोरोना गेला, या भ्रमात लोक बिनधास्तपणे वावरू लागले आहेत. कृती दलानेही त्याबद्दल चिंता व्यक्‍त केली आहे.

Covid-19 Vaccination
शाळा सुरू होणार पण खेळ, सामुहिक प्रार्थना नाही ; अजूनही बरेच काही

दुसरीकडे लसीकरण वाढावे म्हणून दुकान, मॉलमध्ये जाण्यापूर्वीच त्या व्यक्‍तीने दोन्ही डोस टोचलेले असावेत, दोन्ही डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहनातून प्रवास करता येणार आहे, शासकीय कार्यालयात दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल, असे निर्बंध लावले आहेत.

मौलवी, महाराजांकडून देण्यात येणाऱ्या प्रबोधनातून दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना झाला, तर तो रुग्ण सहजपणे बरा होतो, असे निरीक्षण आहे. तरीही, राज्यातील काहीजण गैरसमजुतीतून तर काहीजण धार्मिक शिकवणुकीचा चुकीचा अर्थ काढून लस टोचून घेत नाहीत. त्यांना आता नामांकित व्यक्ती, मौलवी, महाराज व ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या माध्यमातून लसीकरणाचे आवाहन केले जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील लसीकरणाची स्थिती

एकूण लक्ष्य

-9.14 कोटी

पहिला डोस घेतलेले

-7,32,58,023

दोन्ही डोस घेतलेले

-3,87,59,030

एकही डोस न घेतलेले

-1,81,41,977

दुसऱ्या डोसचा कालावधी पूर्ण

-1.03 कोटी

"राज्यातील दीड कोटींहून अधिक व्यक्‍तींनी अजूनही लशीचा एकही डोस घेतलेला नाही. कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवस पूर्ण होऊनही दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या ८९ लाख आहे. तर कोव्हॅक्‍सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाल्यानंतरही १४ लाख व्यक्‍तींनी दुसरा डोस घेतलेला नाही,अशी माहिती आरोग्य सहसंचालक डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com