विनोद तावडेंना पुन्हा विद्यार्थ्यांच्या रांगेत बसवणार; शिक्षकांचा इशारा! 

विनोद तावडेंना पुन्हा विद्यार्थ्यांच्या रांगेत बसवणार; शिक्षकांचा इशारा! 
Published on
Updated on

सोलापूर : "सरकारने शिक्षकाला भिकारी बनवले', "शिक्षणमंत्री जर म्हणत असतील मी शिक्षकांसाठी मंत्री झालो नाही तर राज्यातील शिक्षक त्यांना पुन्हा विद्यार्थ्यांच्या रांगेत बसवतील.' "अधिकाऱ्यांना बदल्यांचा जीआर मात्र सात महिने झाले तरीही समजत नाही' अशा शेलक्‍या शब्दांत शिक्षक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा समाचार घेतला.

शिक्षक नेत्यांच्या शाब्दिक फटकेबाजीला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देत राज्यातील भाजप सरकार विरोधात हल्लाबोल पुकारला. या पुढील आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर करण्याचा निर्णय झाला. 

जुनी पेन्शन योजना लागू करा, वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणीबाबत काढलेला शासन निर्णय रद्द करा, सर्व ऑनलाइन कामे रद्द करून केंद्र पातळीवर डेटा ऑपरेटरची नेमणूक करा, बदली इच्छुक शिक्षकांना बदली मिळावी पण कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी बदलीच्या शासन निर्णयात दुरुस्ती करा, एम. एस. सी. आय. टी. संगणक प्रशिक्षणासाठी मुदतवाढ देऊन वेतनवाढ वसुली थांबवा, शिक्षकांचा पगार दरमहा एक तारखेलाच द्या या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

चार हुतात्मा पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाली. डॉ. आंबेडकर चौक, सिद्धेश्‍वर मंदिरासमोरून जिल्हा परिषदेसमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शिष्टमंडळाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आमदार दत्तात्रेय सावंत व आमदार भारत भालके, रिपब्लिकन पार्टीचे अशोक सरवदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष संतोष पवार मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चामध्ये सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष अंकुश काळे, मागासवर्गीय शिक्षक संघाचे राजाध्यक्ष श्‍यामराव जवंजाळ, राज्य संघाचे सल्लागार बाळासाहेब काळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com