दहशतवादी जान मोहम्मदचा साथीदार झाकीरला अटक

जान मोहम्मद शेख याचा जवळचा सहकारी झाकीर हुसैन शेखला जोगेश्‍वरीतून एटीएस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली.
Terrorist Jaan Mohd.`s colligue Zakir Shaikh arrest by Delhi special team
Terrorist Jaan Mohd.`s colligue Zakir Shaikh arrest by Delhi special teamSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : दिल्लीतील (Delhi) विशेष पथकाकडून (Special Squad) अटक करण्यात आलेल्या सहापैकी एक संशयित दहशतवादी (Terrorist) जान मोहम्मद शेख (Jaan Mohammad Shaikh) याचा जवळचा सहकारी झाकीर हुसैन शेख (Zakir hussain Shaikh) याला जोगेश्‍वरीतून एटीएस (ATS) आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात (Session court) हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी (Two days police custody) सुनावली आहे.

झाकीर जानचा हॅण्डलर म्हणून काम करीत असल्याचे बोलले जाते. मात्र, त्याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. एटीएसचे एक पथक दिल्लीला जान मोहम्मद शेखच्या चौकशीसाठी गेले होते. त्याच्या चौकशीत झाकीर हुसैन शेख याचे नाव समोर आले होते. जानच्या अटकेनंतर झाकीर गायब झाला होता. तो त्याच्या पत्नीला माहेरी सोडून ठाण्यात पळून गेला होता. जान आणि झाकीर अनिस इब्राहिमसाठी काम करीत होते. झाकीरवर मुंबईत मोठ्या प्रमाणात घातपात घडवण्यासाठी हत्यारासह विस्फोटक पुरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जाते. झाकीरच्या अटकेसाठी एटीएस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यां‍नी विशेष मोहीम हाती घेतली होती. शोधमोहीम सुरू असतानाच त्याच्या पत्नीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या मदतीने पोलिसांनी त्याला दूरध्वनी करून जोगेश्‍वरी परिसरात बोलावले. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री उशिरा झाकीर आल्यावर त्याला अटक करण्यात आली. लवकरच त्याला दिल्ली पोलिसांकडे सोपवण्यात येणार आहे. अटकेनंतर त्याला शनिवारी विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

Terrorist Jaan Mohd.`s colligue Zakir Shaikh arrest by Delhi special team
धक्कादायक : भाजपच्या नेत्यांनीच केला दहशतवादी हल्ल्याचा बनाव...

कोण आहे झाकीर?

झाकीर शेख जोगेश्‍वरीत त्याच्या पत्नीसोबत राहत होता. काही वर्षांपूर्वीच त्याची जान मोहम्मदशी ओळख झाली. झाकीरचा भाऊ शाकीर सध्या पाकिस्तानात असून तो अनिस इब्राहिमचा अत्यंत जवळचा सहकारी म्हणून परिचित आहे. त्याच्या मदतीने अनिसने दोघांवर एक मोठी जबाबदारी सोपवली होती.

अनिसच्या सांगण्यावरून झाकीरने जान मोहम्मदला घातपाती कटात सामील करून घेतले होते. त्याच्यावर जान मोहम्मदला लॉजिस्टिक सपोर्ट देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यापूर्वी त्याला खंडणीच्या एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. झाकीरच्या अटकेनंतर आता इतर काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com