कोरोनाचा फटका बसलेल्यांना होणार आयोगाच्या ‘या’ निर्णयाचा फायदा

इच्छुक उमेदवारांची पुन्हा नामनिर्देशनाची लगीनघाई सुरू असतानाच अनामत रकमेचा मुद्दा ऐरणीवर आला. निवडणूक आयोगाने त्यांची ही भीती दूर करीत दिलासा दिला आहे. मार्चमधील निवडणुकांसाठी ज्यांनी नामनिर्देशन करताना अनामत रक्कम भरली त्यांना पुन्हा ती रक्कम भरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
gram-panchayat cartoon
gram-panchayat cartoon

अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका मार्च महिन्यात प्रस्तावित होत्या. तेव्हा नामनिर्देशन दाखल करणाऱ्या ज्या उमेदवारांनी अनामत रक्कम भरली होती. त्यांना आता रक्कम भरावी लागणार नाही, तर तेव्हा रक्कम भरल्याची पावती जोडून नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे निवडणुका स्थगित केल्यामुळे पुन्हा अनामत रक्कम भरावी लागेल की काय, अशी भिती इच्छुक उमेदवारांमध्ये होती, ती निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने मिटली आहे. 

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची धुमधाम सुरू असतानाच पूर्वी नामनिर्देशन केलेल्या उमेदवारांना अनामत रक्कम भरण्यापासून दिलासा मिळाला आहे. पुन्हा अनामत रक्कम भरावी लागणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 13 हजार 320 उमेदवारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांतील 524 ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रस्तावित होत्या. त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती. नामनिर्देशन 6 ते 16 मार्चदरम्यान करण्यात आले. प्रस्तावित 524 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 13,320 सदस्यांनी नामनिर्देशन दाखल केले. 

नामनिर्देशन दाखल करताना अनामत रक्कमही भरली. प्रत्यक्ष मतदानाची प्रतीक्षा करणाऱ्या सदस्यांना मात्र कोरोना साथरोगांचा फटका बसला. नामनिर्देशनाची छाननी सुरू असतानाच या निवडणुका स्थगित करण्यात आल्या व प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. तब्बल नऊ महिन्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल पुन्हा फुंकल्या गेला. जुन्या 524 ग्रामपंचायतींसोबत 29 आणखी ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. जिल्ह्यात आता 553 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून 23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 

इच्छुक उमेदवारांची पुन्हा नामनिर्देशनाची लगीनघाई सुरू असतानाच अनामत रकमेचा मुद्दा ऐरणीवर आला. निवडणूक आयोगाने त्यांची ही भीती दूर करीत दिलासा दिला आहे. मार्चमधील निवडणुकांसाठी ज्यांनी नामनिर्देशन करताना अनामत रक्कम भरली त्यांना पुन्हा ती रक्कम भरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यांना केवळ त्यावेळी अनामत रक्कम भरल्याची पावती जोडावी लागणार आहे. या निर्णयाचा लाभ 13 हजार 320 सदस्यांना मिळणार आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com