कोल्हापूर : खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली नाही तर ते महाराष्ट्र क्रांती सेनेकडून निवडणूक रिंगणात असतील, अशी माहिती पक्षप्रमुख सुरेशदादा पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील लोकसभेच्या 48 व विधानसभेच्या 288 मतदारसंघात महाराष्ट्र क्रांती सेनेने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षाचा पहिला मेळावा 25 नोव्हेंबरला पेठ वडगाव (ता. हातकणंगले) येथे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले, "रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना केली आहे. पक्षाचे मुख्य संस्थापक उदयनराजे भोसले असून, पक्षाला वेगळे वलय मिळाले आहे. सेनेचा 25 नोव्हेंबरला पहिला मेळावा पेठ वडगाव, तर दुसरा शिरोळ येथे होत आहे. त्यानंतर राधानगरी, भुदरगड, चंदगड येथे मेळावे होतील. मतदारांना महाराष्ट्र क्रांती पक्ष तिसरा पर्याय वाटत आहे. पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी होऊ लागली आहे. ही स्थिती लक्षात घेता राज्यातील लोकसभेच्या व विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे."
ते म्हणाले, "सत्ताधाऱ्यांविरोधात आम्ही संघर्ष करणार असून आमचे अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. शेतकऱ्यांच्या नऊ संघटना आमच्या पाठीशी आहेत. आमचे धोरण ठरलेले आहे. मराठा समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्यावर आमचा भर राहणार असून यापुढे मराठा समाज कोणालाही सहजासहजी वापरता येणार नाही. बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांना पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे महिलांन पन्नास टक्के उमेदवारी देणार असून युवकांना प्राधान्य दिले जाणार आहे. पत्रकार परिषदेस राज्य कमिटी सदस्य मदन चव्हाण, प्रा. शिवाजी लोंढे, राहुल इंगवले, उदय लाड, राणी पाटील, जयदीप शेळके, भरत पाटील, परेश भोसले, चंद्रकांत पाटील, मोहन मालवणकर प्रवीण माळी एस. पी. कांबळे, राजू दबडे, सुनिता पाटील, अशोक नाईक, राजू नाईक, मारुती जांभळे, पूजा पाटील, सुजाता खाडे उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.