विदर्भ आमच्या हृदयात, अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे

नागपुरात आता कार्यालय सुरू झालंय. हे कार्यालय वर्षभर सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती. ती आज पूर्ण झाली याचा मला आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई यांच नात अधिक दृढ झाल, असेही ते म्हणाले
Uddhav Thackrey
Uddhav Thackrey

नागपूर : कोरोनामुळे जग जोडले जात असले तरी माणसे दुरावत आहेत. मी तसे होऊ देणार नाही. विदर्भ महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे. विदर्भ आमच्या हृदयात आहे. कधीही अन्याय होऊ देणार नाही. जर कुणी तो करण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही ढाल बनून उभे राहू. त्याचा प्रतिकार करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

नागपुरातील विधानभवनात विधिमंडळ सचिवालयाच्या कायमस्वरूपी कक्षाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. ते मुंबईतून ऑनलाईनरित्या सहभागी झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते कक्षाचे उद्घाटन झाले. यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार प्रामुख्याने उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे हे ऑनलाइनरित्या सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, नागपूर महत्त्वाचे आहे. अनेक निर्णय येथील अधिवेशनात घेण्यात आले. कर्जमाफीचा निर्णय येथेच झाला होता. कोरोनामुळे अधिवेशन होऊ शकले नाही. चर्चेनंतर प्रश्नांची जाणीव झाली. याच्या माध्यमातून ते निकाली काढण्याच प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. नागपुरात आता कार्यालय सुरू झालंय. हे कार्यालय वर्षभर सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून कार्यालय सुरू करण्याची मागणी होत होती. ती आज पूर्ण झाली याचा मला आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने नागपूर आणि मुंबई यांच नात अधिक दृढ झाल, असेही ते म्हणाले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरातील नवीन कक्षाचे स्वागत करीत येथे चांगले सक्षम व विदर्भात काम करण्यास इच्छुक अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच नियुक्ती देण्याची सूचना केली. इच्छुक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. निलम गोऱ्हे, नितीन राऊत, अनिल देशमुख व सुनील केदार यांनीही आपले विचार व्यक्त केले.

भाजपला टोला
सध्या अधिकाराचे केंद्रीकरणावर भर आहे. सर्व काही आपल्याच हाती असावं, असच वातावरण आहे. असे असतानाही आम्ही अधिकाराचे विकेंद्रीकरण करीत आहो, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपला टोला लगावला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com