विजयसिंह मोहिते-पाटील म्हणतात, `भाजपने संधी दिल्यास माढ्यातून लढणार' 

भारतीय जनता पक्षाने संधी दिली तर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी (ता. २६) माढयात दिले.
विजयसिंह मोहिते-पाटील म्हणतात, `भाजपने संधी दिल्यास माढ्यातून लढणार' 

माढा : भारतीय जनता पक्षाने संधी दिली तर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी बुधवारी माढयात दिले. 

खासदार मोहिते-पाटील यांनी बुधवारी माढयात माजी आमदार धनाजीराव साठे , जिल्हा दूध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे यांच्या घरी भेटी - गाठी घेतल्या.  प्रा. संदीप साठे यांचे वडील व माजी आमदार धनाजीराव साठे यांचे बंधू वसंतराव साठे यांच्या वर्षश्राद्धासाठी ते आले होते. 

खासदार मोहिते-पाटील यांना माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी माढा लोकसभा तुम्ही लढण्यास इच्छूक असण्याबाबत विचारले असता पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढण्यास तयार आहे. भाजप प्रवेशाबाबत विचारात उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये प्रवेश करणार असे उत्तर दिले.

भारतीय जनता पक्षाकडून सध्या सुभाष देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, रोहन देशमुख, फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर आता खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाची भर पडली आहे. आता भाजपचा उमेदवार नेमका कोण ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com