विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द अमित देशमुख पाळणार का?

उदगीर नगरपालिकेवर सात टर्म अध्यक्ष राहिलेले निटुरे हे खंदे देशमुख समर्थक म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. उदगीर पंचायत समिती, जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. निटुरे हे लिंगायत समाजातील असल्याने व सध्या काँग्रेसमध्ये या समाजाला प्रतिनिधित्व नसल्यामुळे निटुरे यांना संधी दिली जाऊ शकते.
cogress leader niture get chance to mlc news
cogress leader niture get chance to mlc news
Published on
Updated on

उदगीर : राज्यात सध्या राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. बारा जागांसाठी महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना- राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षात अद्याप कुणी किती जागा घ्यायच्या यावर अजून एकमत झालेले नाही. अशातच उदगीरमधून कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांचे नाव चर्चिले जात आहेत.

दिवंगत विलासराव देशमुख यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून निटुरे ओळखले जातात. निटुरे यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात पालकमंत्री अमित देशमुख यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द दिला होता. तो ते पाळता का? याकडे आता उदगीरकरांचे लक्ष लागले आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्यांवरून सध्या महाविकास आघाडी विशेषतः शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये ताणातणी सुरू आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यावर तोडगा काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसला तिसरा उमेदवार उभा करण्यास शिवसेने विरोध दर्शवला होता. त्या बदल्यात आता राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी एक अतिरिक्त जागा कॉंग्रेस आपल्या पदारात पाडू इच्छित असल्याचे बोलले जाते.

दरम्यान, कॉंग्रेसकडून उदगीरमधून राजेश्वर निटुरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. उदगीर नगरपालिकेवर सात टर्म अध्यक्ष राहिलेले निटुरे हे खंदे देशमुख समर्थक म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. उदगीर पंचायत समिती, जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. निटुरे हे लिंगायत समाजातील असल्याने व सध्या काँग्रेसमध्ये या समाजाला प्रतिनिधित्व नसल्यामुळे निटुरे यांना संधी दिली जाऊ शकते असे बोलले जाते.

गेल्यावर्षी उदगीरमध्ये निटुरे यांच्या एकसष्टीच्या जाहीर कार्यक्रमात पालकमंत्री अमित देशमुख यांनी निटूरे यांना विधानपरिषदेवर निश्चितपणे संधी देऊ असा शब्द दिला होता. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पालकमंत्री देशमुख शब्द पाळणार? निटुरे यांना संधी मिळणार का? याची उत्सुकता आता उदगीरकरांना लागली आहे.

संजय बनसोडे यांच्या रूपाने सध्या उदगीरला राज्यमंत्रीपद मिळाले आहे , त्यात निटुरे यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर उदगीरला दोन आमदारांच्या माध्यमातून विकासकामांना अधिक वेग येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com