आजचा वाढदिवस : दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री

 आजचा वाढदिवस : दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री
Published on
Updated on

नगराध्यक्ष पदापासून आज थेट गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्रीपदापर्यंत दीपक केसरकर यांनी मजल मारली आहे. केसरकर यांचा प्रवास तरूणाईला दिशा देणारा आहे. आज ते गृहराज्यमंत्री म्हणून राज्याची यशस्वी जबाबदारी सांभाळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतवादाच्या विरोधात त्यांनी लढा दिला. जिल्ह्याला विकासाचे स्वप्न दाखविले. त्यामुळे येथील जनतेने एक सच्चा माणूस म्हणून त्यांना निवडून दिले. लोकांनी टाकलेला विश्‍वास सार्थकी लावण्यासाठी मी शेवटच्या श्‍वासापर्यंत काम करणार असे केसरकर आवर्जून सांगतात. केवळ घोषणा न करता जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात 28 कोटी रूपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आहे. आगामी काळात जिल्ह्याचा कायापालट करीन असा त्यांना विश्‍वास आहे. येथील शेतकरी व बागायतदार सुखी व्हावा, महिलांच्या हाताला काम मिळावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी त्यांनी अनेक योजना जिल्ह्यात आणल्या आहेत. शेती आधुनिक व्हावी, त्यातून उत्पन्न वाढवावे, यासाठी यांत्रिकी शेतीचा प्रयोग त्यांनी राबवला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांचे कुटुंब सावंतवाडी शहरातील उद्योजक व श्रीमंत म्हणून ओळखले जाते. त्यांच्या वाडवडीलांनी वेगवेगळे उद्योग व शेती केली. पालकमंत्री केसरकर यांचे वडील सावंतवाडी शहरात नगरशेठ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी शहराच्या विकासात भरभरून मदत केली आहे. यामुळे सहाजिकच दीपक केसरकर यांना सामाजिक व राजकीय क्षेत्राची आवड निर्माण झाली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com