आजचा वाढदिवस :  हुसेन दलवाई (ज्येष्ठ नेते, कॉग्रेस)

यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखले जाते.
Sarkarnama Banner - 2021-08-17T093101.118.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-17T093101.118.jpg
Published on
Updated on

पुणे ; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई Hussain Dalwai आज (ता. १७) शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांनी काँग्रेस वाढीसाठी भरीव योगदान दिले आहे. हुसेन दलवाई रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदारसंघातून चार वेळा विधानसभेवर निवडून आले होते. यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखले जाते.

इंदिरा गांधी यांनी त्यांची राज्यसभेवरही निवड केली होती. इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना रत्नागिरी मतदारसंघातून लोकसभेसाठी तिकीट दिले व ते तिथून चांगल्या मताधिक्याने निवडून आले. 

बैलगाडा शर्यतीसाठी बाळा भेगडेंचे फडणवीसांनाच साकडे
लोकसभा निवडणुकीदरम्यान दलवाई यांना अस्वस्थ वाटू लागल्याची बातमी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे डॉ. नातू यांना कळताच त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडून त्यांना भेटण्यासाठी दलवाई यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांना तपासून औषधोपचार सांगून बरे असल्याची खात्री करून तिथून निघून गेले. केंद्रीय हज समिती व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपदही दलवाई यांनी सांभाळले आहे.

महाविकास आघाडीच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले 
औरंगाबाद : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीआरपी) संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.  ‘‘महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi कार्यकाळात राज्यातील दलितांवर अत्याचार वाढल्याची खंत जोगेंद्र कवाडे Jogendra Kawade यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ‘पीआरपी’ सत्तेत सहभागी असला तरी दोन वर्षांपासून सत्तेचा वाटा न मिळाल्याने कवाडे यांनी नाराजीही व्यक्त केली.
Edited by : Mangesh Mahale
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com