आजचा वाढदिवस : मुक्ता टिळक (आमदार भाजप)  

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वतीने कसबा मतदारसंघात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
 Mukta Tilak .jpg
Mukta Tilak .jpg
Published on
Updated on

पुणे : आमदार मुक्ता शैलेश टिळक (Mukta Tilak) यांची राजकीय कारकीर्द २००२ मध्ये सुरु झाली. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या (Bjp) वतीने पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या नंतर २००७, २०१४ व २०१७ असे सलग ४ वेळा पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्या. (Today's Birthday: Mukta Tilak) 

पुणे मनपाच्या शहर सुधारणा समिती, प्रभाग समिती अध्यक्ष स्थायी समिती सदस्य आणि पुणे मनपाच्या बायो डायव्हसिटी समिती सदस्य अशा विविध पातळ्यांवर काम केले. २०१७ मध्ये त्यांना पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळाला. 

त्याच बरोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वतीने कसबा मतदारसंघात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच पक्ष संघटनेत शहर भारतीय जनता पक्षाच्या शहर उपाध्यक्ष, भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षा, कोशाध्यक्षा व प्रदेश कार्यकारणी सदस्य इत्यादी पदांवर त्यांनी काम केले आहे. 

पुण्यात नाना वाडा येथे क्रांतिकारक संग्रहालय, सँनिटरी नँपकिन डिस्पोजल प्रकल्प, पुणे मनपा शाळेमध्ये अत्याधुनिक विज्ञान व संगणक प्रयोग शाळेची निर्मिती, प्रभागातील विविध उपक्रम जुन्या पोलिस चौक्यांचे नूतनीकरण, क्रिडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळाची निर्मिती, मध्यवस्तीत सुरळीतपणे वीजपुरवठा होण्यासाठी सबस्टेशन उभारणी साठी विशेष प्रयत्न त्यांनी केले. 

लोकमान्य टिळक विचार मंचया संस्थेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले. लोकमान्याच्या विचारांचे महत्व विशद करणाऱ्या पुस्तकांची व दैनंदिनीची निर्मिती त्यांनी केली आहे. आमदार निधीतून पुण्यातील ५८ विविध शाळांना क्रिडा साहित्य पुरविणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या आमदार ठरल्या आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com