नेतृत्व बदलासाठी भाजप आमदारांचा दबाव 

त्वरित नेतृत्वबदल केला तरच हे राज्य भाजपच्या हातात राहील, असा इशारा दिला आहे.
BJP .jpg
BJP .jpg

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येदियुरप्पा (B. S. Yeddyurappa) यांच्याविरुद्ध आता सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या (Bjp)आमदारांनीच दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्वरित नेतृत्वबदल केला तरच हे राज्य भाजपच्या हातात राहील, असा इशारा दिला आहे. यावेळेस केंद्रीय नेतृत्वाने येडियुरप्पा यांना साथ न दिल्याचे दिसत असून त्यामुळे त्यांना स्वतःलाच असंतुष्ट आमदारांच्या विरुद्ध लढाई लढावी लागत आहे. (BJP MLAs pressure for change of leadership)

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींपासून (L K Advani) सुमित्रा महाजनांपर्यंतच्या वरिष्ठ नेत्यांना लावलेला पंच्याहत्तरीचा निकष भाजप सर्वेसर्वा नेतृत्वाने येदीयुरप्पा यांच्यासाठी बाजूला ठेवला होता. मात्र आता बदलत्या परिस्थितीत 79 वर्षीय यदियुरप्पा यांची घटलेली लोकप्रियता, त्यांची घराणेशाही, त्यांच्या विरुद्ध एका वादग्रस्त सीडीचे प्रकरण आणि त्यांच्याविरुद्धचा पक्ष संघटनेतील असंतोष यामुळे त्यांना बदलणे भाग आहे असे भाजप आमदारांपैकी बहुसंख्य्यांचे मत आहे.

येडीयुरप्पा यांचे वय झालेले असताना त्यांच्या बी. बाय. विजयेंद्र आणि खासदार बी वाय राघवेंद्र या दोन मुलांच्या दबावाखाली कर्नाटकमधील भाजप संघटन गुदमरत असल्याचा जाहीर आरोप होत आहे. भाजप आमदारांपैकी किमान निम्म्या आमदारांनी येदियुरप्पा यांच्या घराणेशाहीविरुद्ध भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. येदीयुरप्पा यांनी कर्नाटकातील सामाजिक समीकरणांच्या जोरावर भाजपमध्ये अभेद्य स्थान मिळवले आहे. जनाधार आणि पक्ष संघटनेच्या पाठिंब्यावर जोरावर येदियुरप्पा यांनी अनेकदा भाजपच्या नेतृत्वाला वाकवले आहे. अलीकडे येदियुरप्पा यांचे एक वादग्रस्त सीडी प्रकरण कर्नाटकच्या (Karnataka) राजकीय वर्तुळात गाजत आहे. 

येदियुरप्पा विरोधी गटातील एका भाजप आमदाराने नुकतेच दिल्लीत येऊन येदियुरप्पा यांच्या तुझ्या सीडी आख्यानाचे 'दर्शन' पक्षनेतृत्वाला घडविले असे वृत्त आहे. आता त्यांच्याविरुद्ध नवे संकट पक्षांतर्गत आणि पक्षाच्या धोरणाच्या संदर्भात लक्षणीय आहे. येदियुरप्पा यांच्या दोन्ही मुलांची राज्य सरकार आणि प्रशासनातील वाढती लुडबुड सत्तारुढ आमदारांना चांगलीच खुपू लागली आहे. या नाराजीने आता मुखर रूप धारण केले आहे. केंद्रातील प्रल्हाद जोशी व राज्यातील के. एस ईश्वरप्पा, लक्ष्मण सावधी, डॉ सी. एन अश्वथ नारायण, गोविंद करजोल आदी नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. 

या वर्षाअखेर केंद्रीय नेतृत्व कर्नाटकमध्ये भाकरी फिरवेल व केंद्रातील कोणी नेता कर्नाटकात पाठवेल असा विश्वास येदियुरप्पा पुत्रांना आव्हान देणारे आमदार व्यक्त करत आहेत. लक्षणीय बाब म्हणजे भाजपच्या मातृसंस्थेतील सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष दोन वरिष्ठ नेते कर्नाटकातलेच आहेत. केंद्रीय नेतृत्वाकडून या वेळेला येदियुरप्पा यांना अजिबात पाठिंबा न मिळण्याचे तेही ठळक कारण सांगितले जाते. मोदीयुगात ज्या मोजक्या भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वऐवजी स्वतःचे मत चालविले त्यात राजस्थानच्या वसुंधरा राजे, हिमाचलाचे प्रेमकुमार धूमल यांच्यानंतर येदियुरप्पा यांचा समावेश होतो. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भाजप आमदारांनामध्ये असलेला असंतोषाचा वणवा त्यांना एकट्यालाच निस्तरू द्यावा व संधी मिळताच लवकरात लवकर भाकरी पलटावी अशी भूमिका सध्या भाजप नेतृत्वाने घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com