'आॅफर' बद्दल पंकजा मुंडेंनी मानले खोतकरांचे आभार

पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे असं शिवसेनेचे माजी मंत्रीअर्जुन खोतकर यांनी म्हटले होते. त्यावर पंकजा मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांनी दिलेली ऑफर मी माध्यमांच्या माध्यमातून ऐकली आहे, असे सांगत खोतकरांचे आभार मानले.
Pankaja Munde - Arjun Khotkar
Pankaja Munde - Arjun Khotkar
Published on: 
Updated on: 

जालना : एकनाथ खडसे यांच्या जाण्याने भाजपला उतरती कळा लागली आहे.भाजपने आतापर्यंत जे पेरलं तेच उगवायला सुरुवात झाली झाली आहे.भाजपच्या कोणत्याही नेत्यासाठी शिवसेनेचे दरवाजे उघडे असून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे असं शिवसेनेचे माजी मंत्री  अर्जुन खोतकर यांनी म्हटले होते. त्यावर पंकजा मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांनी दिलेली ऑफर मी माध्यमांच्या माध्यमातून ऐकली आहे, असे सांगत खोतकरांचे आभार मानले. 

“मागच्या पाच वर्षांमध्ये भाजपने जी काही भरती आली होती, ती आता ओसरायला लागली असून खडसेंसारखा ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय हा भाजपला मोठा धक्का आहे. भाजपचे आणखीही बरेचसे नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते देखील येत्या काळात योग्य तो निर्णय घेतील. शिवसेनेची दारं सगळ्यांसाठी उघडी आहेत. पंकजा ताईच काय राज्यातला कुणीही नेता ज्याला सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी काम करायचंय, अशा नेत्यांना शिवसेनेची दारं उघडी आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करु,'' असे सांगत शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाची 'आॅफर' दिली होती.  त्यावर पंकजा यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली आहे. 

''पंकजा मुंडे यांनी नाथाभाऊ जाणार नाहीत असे मी वेळोवेळी व्यक्त केले होते. मात्र मला सुद्धा धक्का बसलाय. वाईट वाटलं. वेदना झाल्या आहेत. त्यांच्या जाण्याने मी खंत व्यक्त करते. पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याच बरोबर विशिष्ट लोकांच्या अपेक्षा, त्याच बरोबर काही पीडित, वंचीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आहे. त्या शेवटपर्यंत पूर्ण करण्याचे काम मी करणार आहे," असे सांगत पंकजा यांनी खोतकर यांचे आभार मानले.
Edited By - Amit Golwalkar

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com