गिरीश महाजन यांचे आव्हान; आमची `ईडी` लागली, तुमची सीडी दाखवा 

आमची `ईडी` लागली, आता तुमची `सीडी` दाखवा असे आव्हान भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
Khadse- Mahajan
Khadse- Mahajan
Published on: 
Updated on: 

जळगाव : आमची `ईडी` लागली, (Our ED is works on) आता तुमची `सीडी` दाखवा (Now show your CD) असे आव्हान भाजप नेते गिरीश महाजन  (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader)  नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिले आहे.

जळगाव येथे आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, आमची `ईडी` लागली आता त्यांनी सीडी दाखवावी, ही सीडी पोलीस चौकशी करण्यासाठी दिली आहे, त्याची लवकर चौकशी करून ती बाहेर काढावी तसेच याबाबत त्यांनाच विचारा असे आव्हानही त्यांनी श्री. खडसे यांचे नाव न घेता दिले.

...तर आम्ही मंदिरे उघडू
राज्यातील मंदिरे सरकारने त्वरित उघडवित असे त्यांनी आवाहन केले. ते म्हणाले सद्या केवळ राज्यातील मंदिरेच बंद आहेत. आज आम्ही ती उघडण्यासाठी घंटानाद केला. शासनाने जर त्वरीत निर्णय घेतला नाही तर आम्ही स्वतः मंदिरे उघडू, असा ईशारा त्यांनी दिला.
...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com