

नाशिक : भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. नाशिकमध्ये अज्ञात कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. यामध्ये कार्यालयाच्या दोन काचा फुटल्या.
या घटनेची माहिती मिळाल्यावर येथो पोलिस दाखल झाले. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष गिरीष पालवे व अन्य कार्यकर्त्यांनी पोलिसांनी याबाबत कारवाई करावी. भाजपच्या कार्यालयावर दगडफेक जाणीवपूर्वक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी काळजी घ्यायली हवी होती. पोलिसांनी खबरदारी घेतली असती तर ही घटना टळली असती, असे श्री. पालवे यांनी सांगितले.
दरम्यान याबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल तांबे यांनीही माहिती दिली. ते म्हणाले, आज सकाळी अज्ञात युवकांनी येथे दगडफेक केली. त्याची माहिती मिळाल्यावर भद्रकाली पोलिस ठाण्याचे कर्मचारी येथे आले. त्यांनी परिसरातील नागरिक तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार आम्ही आरोपींची नावे निष्पन्न करण्याची प्रक्रीया हो आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार लवकरच संबंधीतांना ताब्यात घेतले जाईल.
या घटनेनंतर पोलिसांनी शिवसेना आणि भाजप दोन्ही कार्यालयांबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी याबाबत माहिती घेतल्यावर भाजप कार्यालयाला भेट देऊ पाहणी केली. यासंदर्भात पोलिस कारवाई करीत आहे. काही माहिती हाती आली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल.
...
हेही वाचा...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.