आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघा म्हणून; मुख्यमंत्री पंतप्रधांनांना पत्र लिहतील!

महाविकास आघाडीला वाटते की जनता मूर्ख आहे. दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही.
 Uddhav Thackeray .jpg
Uddhav Thackeray .jpg

मुंबई : राज्य सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) लग्नासाठीसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधांनांना पत्र लिहतील, असा टोमणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला आहे. (BJP state president Chandrakant Patil criticizes Chief Minister Uddhav Thackeray)

ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीबद्दल पाटील म्हणाले, पवारांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याने फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंना विनंती केली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पवारांची भेट घेतली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडे आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नात मिरवणूक काढली, गर्दी जमवली हे चुकीचे आहे. महेश लांडगे यांना समज देण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले, महाविकास आघाडीला वाटते की जनता मूर्ख आहे. दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्यामुळे इथे केंद्राचा काहीही संबंध नाही. हे सरकार कोडगे आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघायची असेल तेव्हाही उद्धव ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहतील, तुमच्या बघण्यातली दिल्लीतली कोण असेल तर सांगा, अशी टीका पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छत्रपती खासदार संभाजीराजेंनी (Chhatrapati Sambhaji Raje) राजीनामा देण्याचीही तयारी वर्तवली आहे. याविषयी विचारणा केली असता पाटील म्हणाले, संभाजीराजेंनी राजीनामा देऊन काय साध्य होणार आहे, हे माझ्या लक्षात येत नाही. तर सरकार हेरगिरी करत असल्याविषयीच्या संभाजीराजेंच्या ट्विटवरुन ते म्हणाले, संभाजीराजेंनी ते ट्विट केले, मात्र पुन्हा काही वेळाने आपण गृहमंत्र्यांशी याविषयी चर्चा केल्याचे सांगत दुसरे ट्विट केले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेले खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी काल खळबळजनक दावा केला होता. सरकार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्याच्या या आरोपावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

वळसे पाटील यांनी या संदर्भात ट्वीट करुन माहिती दिली. त्यामध्ये ते म्हणाले की ''छत्रपती संभाजीराजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांदरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता,'' असे गृहमंत्री यांनी सांगितले आहे. यासंदर्भात माझी संभाजी राजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे, असेही वळसे पाटील यांनी म्हटले होते. 

त्यानंत छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की ''आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकी चे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबरमध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून. हा विषय संपला आहे'' असे संभाजीराजे यांनी म्हटले होते. 
Edited By - Amol Jaybhaye  


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com