दाऊद इब्राहिमचा हस्तक NCBच्या जाळ्यात 

मोहम्मद आरिफ हा माझगावच्या परिसरात येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती.
Sarkarnama (78).jpg
Sarkarnama (78).jpg
Published on: 
Updated on: 

मुंबई :  केंद्रीय अंमली पदार्थ विभागाने Central Narcotics Department कुख्यात डाँन दाऊद इब्राहिमच्या Dawood Ibrahimहस्तकाला अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अटक केली आहे. एनसीबीने NCB त्याच्याकडून १० लाखा़चे ड्रग्ज जप्त केले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला सापळा रचून अटक केली आहे. ड्रग्स प्रकरणातील 3 गुन्ह्यात तो फरार होता.
 
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्जची तस्करी करण्यासाठी मोहम्मद आरिफ हा माझगावच्या रेरोड परिसरात येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यावरुन एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यांना अटक केली आहे. 

मोठी बातमी : गणेशोत्सवाच्या काळात जमावबंदी  
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, काल रेय रोडवरून अवैध बाजारात 10 लाख रुपये किमतीच्या एमडी औषधासह मोहम्मद आरिफ Mohmmad Aarifयाला अटक केली. मोहम्मद आरिफ हा दाऊद इब्राहिमचा सहकारी चिंकू पठाणशी संबंधित ड्रग्स प्रकरणात तीन गुन्ह्यात फरार होता. त्यांच्या अटकेनंतर अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. 

 सचिन वाझेने मुख्यमंत्र्यापासून सत्य लपविलं! 
मुंबई : अँटिलिया प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA करीत आहे. या प्रकरणात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा जबाब नोंदविला आहे. या जबाबात महत्वपूर्ण बाबींचा उलगडा झाला आहे. व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav-thackerayयांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख, निंलबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com