मोदी म्हणतात, 'जीएसटी भरायला नकार द्या'

तुम्ही किती दिवस रेफ्युजी म्हणून रडत बसणार आहात?
Sarkarnama Banner - 2021-07-31T090729.634.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-31T090729.634.jpg
Published on: 
Updated on: 

मुंबई : ''कोरोना संकटात व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन वर्षांपासून त्यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीतही सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. तुम्ही सर्वजण एकत्र या अन् जीएसटी भरायला नकार द्या,'' असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू व ऑल इंडिया फेयर प्राइस शॉप एसोसिएशन के उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना केलं.
शिवसेनेचा गृहमंत्र्यांचा सल्ला 'वेळीच पावले उचला'
उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद मोदी काल बोलत होते.  ते म्हणाले की,  तुम्ही किती दिवस रेफ्युजी म्हणून रडत बसणार आहात? एकीचं बळ दाखवा आणि आता लढायला शिका. एकत्र या अन् जीएसटी भरायला नकार द्या, मग बघा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे पंतप्रधान नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील
राष्ट्रवादीच्या कार्यालयातील काळी बाहुली हटवा
या विषयावर राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करा. असं केलं तरच उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी तुमच्या दारात येतील. आम्ही लोकशाहीत राहतो, गुलामगिरीमध्ये नाही.कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबरनाथ, उल्हासनगर येथील व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, ते सरकारने मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी मोदी यांच्याकडे येथील व्यापाऱ्यांनी केली. 

‘बिर्याणी’ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल
पुणे : मोफत बिर्याणीची फर्माईश करणाऱ्या पोलिस उपायुक्तांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपची दखल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे. याप्रकरणी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, वळसे पाटील यांनी सांगितले.
 Edited by : Mangesh Mahale 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com