थोरातांच्या मतदारसंघात डाॅ. विखेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी संघटन मजबूत झाले पाहिजे. पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेले काम जनतेपर्यंत पोचवावे लागेल. निवडणुका आल्या तरच जनतेकडे जाण्याचे दिवस आता संपले आहेत.
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

संगमनेर : आपले गाव व गण तसेच प्रत्येक प्रभागात नागरिकांचे कोविड (Covid) लसीकरण झाले की नाही, याची माहिती घेण्यासाठी संपर्क अभियान सुरु करा. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या योजना घराघरात पोचवण्याचे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. (In the constituency of Thorat, Dr. Kanmantra of Vikhen activists)

संगमनेरमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व भाजयुमो पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठकीत त्यांनी आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा कानमंत्र दिला. हेवेदावे आरोप-प्रत्यारोप विसरून पक्ष संघटनेत मेहनत घेवून जनतेपर्यंत पोचलेल्या कार्यकर्त्यांचे मूल्यमापन उमेदवारी देताना होईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

ते म्हणाले, आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी संघटन मजबूत झाले पाहिजे. पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेले काम जनतेपर्यंत पोचवावे लागेल. निवडणुका आल्या तरच जनतेकडे जाण्याचे दिवस आता संपले आहेत. लोकांसाठी काम आणि प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहते, हा विचार मनात ठेवून, आपले गाव, गण आणि बुथ सक्षम करण्याबाबत त्यांनी सूचित केले. स्थानिक पातळीवरच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेले काम लोकांना सांगण्यासाठी पुरेसे आहे. देशात मोदींमुळे सर्व नागरिकांना मोफत लस मिळाली. लाभार्थींना दिवाळीपर्यंत मोफत धान्य मिळाले. या सर्वाचा आढावा कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रत्येक कुटुंबात जावून घेतला, तरी पक्षाचे जनसंपर्क अभियान होवू शकेल. केंद्र सरकार राबवित असलेल्या योजनांचा प्रसार आणि प्रचार हाच आपल्या सर्वांचा अजेंडा असेल. स्थानिक प्रश्नाबाबत लवकरच एक पुस्तिका काढून अपयश दाखवून देणार असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले.

या वेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ. अशोक इथापे, रखमा खेमनर, डॉ. सोमनाथ कानवडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड. श्रीराज डेरे, उपाध्यक्ष जावेद जहागिरदार, नगरसेविका मेघा भगत, व्यापारी आघाडीचे शिरीष मुळे, काशिनाथ पावसे, अमोल खताळ, संघटक योगिराजसिंग परदेशी, शैलेश फटांगरे, दिपेश ताटकर, राहुल भोईर, मंजित गायकवाड, वैभव लांडगे, अँड. दिपक थोरात, नानासाहेब दिघे, साहेबराव वलवे, संदीप देशमुख आदींसह तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com