केंद्रात भाजप असेपर्यंत ईडी आमच्या जीवनात राहिल : महसूलमंत्री थोरात

महाविकास आघाडी सरकार बनले ते्हापासून हे सरकार पडण्याची वाट भाजप पाहत आहे. परंतु त्यांनी वाट पाहू नये. पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले, तर त्यांनी आश्चर्य मानू नये.
balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg

मुंबई : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना तीन मुद्द्यांवर पत्र दिले होते. यावरून भाजप राज्यपालांची दिशाभूलकरीत आहे, असे दिसते. विनाकारण राज्यपाल व राज्य सरकार यांच्यात मतभेद होत आहेत. ईडी हे नाव आम्ही कधी ऐकले नव्हते. भाजप केंद्रात जोपर्यंत आहे, तोपर्य़ंत ईडी हे आमच्या जीवनात राहिल, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांनी केंद्र सरकारला लगावला. (As long as BJP is at the center, ED will remain in our lives: Revenue Minister Thorat)

थोरात म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार बनले ते्हापासून हे सरकार पडण्याची वाट भाजप पाहत आहे. परंतु त्यांनी वाट पाहू नये. पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले, तर त्यांनी आश्चर्य मानू नये, असेही थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा..

मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त हे अभियान

नगर : महापालिकेेचा कौन्सिल हॉल ऐतिहासिक असाच आहे. परंतु आगीत भस्मसात झाल्यापासून त्याकडे दुर्लक्ष होत गेले. आता या हॉलच्या जिर्णोद्धारसाठी विविध क्षेत्रातील कलाकार घेत असलेला पुढाकार कौतुकास्पद असून, आपणही मनपाच्या माध्यमातून तसेच नियोजन समितीच्या माध्यमातून या हॉलच्या जिर्णोद्धारासाठी विशेष निधीची मागणी करणार आहोत. त्याचच एक भाग म्हणून मनपाच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व इतिहासप्रेमी, साहित्यिक, कला, क्रीडा क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. त्यामुळे पुढील काळात या हॉलचा जिर्णोद्धार होऊन नवसंजीवनी मिळेल. सर्वांच्या सहकार्याने हा प्रश्‍न नक्कीच मार्गी लागेल, असे प्रतिपादन मनपा स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी केले.

मनपाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील इतिहासप्रेमी व सामाजिक संस्था यांनी जुन्या मनपातील कौन्सिल हॉलमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

रफिक मुन्शी म्हणाले, की मनपाचा कौन्सिल हॉल अनेक नव्या-जुन्या कलाकारांसाठी यशाचे व्यासपीठ ठरले आहे. या हॉलमध्ये पूर्वी अनेक दिग्गजांच्या मैफिली, समारंभ, व्याख्याने आदिंसह इतर अनेक कार्यक्रम पार पडलेले आहेत. या हॉलचे पुनर्जिवन व्हावे, यासाठी मनपा सभापती अविनाश घुले यांनी या हॉलची पाहणी करुन जिर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर सहकार्य करतील. त्यासाठी कलाकारांच्यावतीने आगीत भस्मसात झालेल्या या हॉलची साफ-सफाई, स्वच्छता करुन या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम करुन त्यादृष्टीने एक पाऊल टाकले आहे. यापुढेही अशाच उपक्रमांद्वारे हॉलच्या जिर्णोद्धारासाठी आम्ही सर्व कलाकार प्रयत्नशील राहतील, असा विश्‍वास मुन्शी यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com