एकनाथ खडसे म्हणतात, `पायी वारी व्हायला हवी होती`

पांडुरंगाच्या दर्शनाला हजारो वारकरी आसुसलेले असता. त्यामुळे काही नियम घालून देत पायी वारी व्हायला हवी होती. सरकारने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते, अशी खंत माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
Eknath Khadse
Eknath Khadse

जळगाव : पांडुरंगाच्या दर्शनाला हजारो वारकरी आसुसलेले असता. (All Warkaris are Infused for Pandharpur vari) त्यामुळे काही नियम घालून देत पायी वारी व्हायला हवी होती. सरकारने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते, (Government shall be given permission) अशी खंत माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांनी व्यक्त केली.

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्तच्या पायी वारी, पालख्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत बोलताना खडसे म्हणाले, की आपल्या जिल्ह्यातून मुक्ताईच्या पालखीसह पायी वारी निघते. शेकडो वर्षांच्या या परंपरेतील वारीत हजारो भाविक सहभागी होतात. ठिकठिकाणी या पालख्यांचे स्वागत, पूजन होते. हजारो भाविकांची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे. त्यामुळे यंदातरी सरकारने सकारात्मक विचार करून वारीला परवानगी द्यायला हवी होती, असे खडसे म्हणाले.

राज्य शासनाने गतवर्षीप्रमाणेच यंदाही राज्यात कोरोनाचा संसर्ग व वाढती रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीवर काही बंधने घातली आहेत. त्यात परंपरेतील व मानाच्या दहा पालख्याना एस.टी. बसने पंढरपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. त्यावरून भारतीय जनता पक्षाने प्रथेप्रमाणे विरोध दर्शवला आहे. राजकीय भूमिकेतून हा विरोध असल्याने त्याबाबत सरकारने गांभिर्याने पाहिलेले नाही. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी कॅांग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील वारकऱ्यांची खंत व्यक्त केली. ते सत्तेतील पक्षाचे नेते असल्याने त्याची मात्र चर्चा होत आहे.   
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com